शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

बदल्यांच्या रॅकेटची पाळेमुळे खोलवर

By admin | Published: June 03, 2017 4:58 AM

आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार आणि महानंदचा

यदु जोशी/मनीषा म्हात्रे / लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार आणि महानंदचा सरव्यवस्थापक (वित्त व लेखा) विद्यासागर हिरमुखे आणि त्याचा साथीदार किशोर माळी यांचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे. या दोघांसह अटक केलेले विशाल उंबळे आणि रवींद्रसिंह यादव या चौघांच्या रॅकेटने उत्पादन शुल्क आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांकडून बदल्यांसाठी मोठी रक्कम उकळल्याचे सांगण्यात येते. या रॅकेटची पाळेमुळे खोल असल्याचे चौकशीतून समोर येत आहे.हिरमुखे, माळी, नवी दिल्लीचा वीरेंद्रसिंग यादव आणि पुण्याचा विशाल ओंबळे यांना बुधवारी रात्री मुंबई विमानतळानजीकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेने अटक केली होती. या चौघांकडून धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे समजते. फसवणूक झालेले बरेच अधिकारी उगाच कटकट नको, म्हणून तक्रार करण्यास टाळाटाळ करीत असले, तरी या चौघांच्या चौकशीमध्ये त्यांनी कोणाकडून किती पैसा घेतला, याची माहिती समोर येऊ शकते. सोलापूरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांची मुंबईला बदली करून देतो, म्हणून या रॅकेटने पैशांची मागणी केली होती. चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. चारही आरोपींना न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींपैकी रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा बारावी नापास असून, तो दिल्लीतील साकेत भागातील रहिवासी आहे. तो स्वत:ला केंद्रीय सल्लागार असल्याचे भासवतो. त्याची दिल्लीत कन्स्लटन्सी फर्म आहे. आयएस, आयपीएस बदल्यांबरोबर जमिनीचे व्यवहार, शासकीय कामांमध्ये पैसे घेऊन तो काम करतो. पुण्याच्या विशाल उंबळेविरुद्ध पुण्यात दोन खंडणी आणि दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गृहविभागाचा अधिकारी असल्याचे भासवून तो पैसे उकळत होता. बोरीवलीतील आरटीआय चॅरिटेबल ट्रस्टशी या रॅकेटने आर्थिक व्यवहार केल्याची माहिती आहे.ती पोलीस प्रशिक्षण संस्थाही चौकशीच्या घेऱ्यातसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सिद्धराम शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण संस्था चालविली जाते. या संस्थेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतल्यास, नोकरीची शाश्वती दिली जात होती. उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांची पोलिसात भरती करण्याचे प्रकार घडले काय, याची चौकशीही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यासागर हिरमुखेचा या प्रशिक्षण संस्थेशी काय संबंध होता, याचीही चौकशी होऊ शकते. हा किशोर माळी कोण? रॅकेटमधील एक असलेला किशोर माळी हा सोलापूरचा रहिवासी आहे. तो बालाजी सरोवर इंटरनॅशनल आणि हॉटेल त्रिपुरी सुंदरी या सोलापुरातील आलिशान हॉटेलांमध्ये अनेक दिवस मुक्कामी राहिला. या काळातले बिल थकवल्याने दोन्ही हॉटेलांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केल्याचे समजते. माळी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. नंतर तो विद्यमान मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात गेला. सोलापुरात त्याने जानकरांच्या उपस्थितीत मेळावादेखील घेतला होता.