पंढरपूर : चौथा श्रावण सोमवार निमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभाºयात कापसापासून हिमालय पर्वताची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व हिंदू सण आणि विशेष दिनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, सोळखांबी चौखांबी, गाभाºयात विविध प्रकारची फुले, फळे याद्वारे आकर्षक सजावट करण्यात येते.
आज चौथा श्रावण सोमवार आणि अजा स्मार्त एकादशीनिमित्त कापसापासून हिमालय पर्वताची प्रतिकृती साकारली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारची आरास केल्यानंतर श्रींचे ते रूप भाविकांना आकर्षित करून घेते. दर्शनाबरोबरच भाविकांचे मन प्रसन्न, प्रफुल्लीत होते. एक प्रकारचे समाधान मिळते, त्यामुळेच हा उपक्रम सतत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.