शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

एचडीआयएलप्रकरणी अहवाल द्या - मुख्यमंत्री

By admin | Published: July 21, 2016 3:15 AM

एचडीआयएलने परवानग्यांचा वापर आर्थिक फायद्यासाठी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

विरार : येथे खाजगी मालकीची जमिन सरकारी दाखवून रेंटल हाऊसिंंगस्कीममध्ये शासनाची दिशाभूल करून एचडीआयएलने परवानग्यांचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेत.विरार येथील ग्लोबल सिटीतील आराखड्यात तत्कालीन आयुक्त, नगररचना विभाग, सिडको प्राधिकरण आणि एचडीआयएल, एव्हरशाइन डेव्हलपर्स व त्यांचे आर्किटेक्ट यांनी केलेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी उघडकीस आणले होते. शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न बुधवारी केला होता. त्यावर चर्चा होऊ शकली नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी शासनाच्या वतीने लेखी उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवले. राज्य शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल वसई-विरार महानगरपालिका व नगररचना संचालनालयाकडून मागविला असून तो प्राप्त झाल्यानंतर त्यावर शासन पुढील कार्यवाही करील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेआहे.