शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पालिकेकडून मनी व मुनीच्या चौकशीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर; सेनेच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 3:12 PM

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

राजू काळेभार्इंदर, दि. २४ - आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला पाठविलेल्या पत्रात त्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने नुकताच चौकशी अहवाल आयोगाला सादर केल्याचे पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.निवडणुकीपूर्वी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत नसल्याने त्याची दोरी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. निवडणुकीत प्रचार सभांद्वारे भाजपालाच मतांचा जोगवा देण्याच्या आनाभाका घालण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपाच्याच हाती सत्ता यावी, यासाठी केंद्र तसेच राज्यातील भाजपा मंत्र्यांसह खासदार, आमदारांना मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दरम्यान विविध खासगी संस्थांच्या मार्फत केलेल्या सर्वेक्षणात भाजपा ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली.काहींनी पहिल्या क्रमांकावर शिवसेना तर काहींनी शिवसेना, भाजपा व काँग्रेसची त्रिशंकू सत्ता येणार असल्याचे भाकीत केले. या सर्वेक्षणामुळे बिथरलेल्या काही भाजपा उमेदवारांनी आपापल्या प्रभागांतील मतदारांना पैसे वाटल्याचे समोर येऊ लागले. यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शहराला ख-या अर्थाने निवडणूक दंगलीचे स्वरुप येऊ लागले. याप्रकरणी पोलिसांत शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी त्या पैसे वाटपाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात तथ्य आढळले नसल्याची क्लिन चीट पोलिसांकडुन देण्यात आल्याने विरोधकांची हवा गुल झाली. तरीदेखील ही निवडणूक हाती राखण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी चालविलेल्या भाजपाने अखेर धर्माचे शस्त्र बाहेर काढले. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने धर्मगुरुंच्या माध्यमातुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यांना भाजपाच्याच पारड्यात मते टाकण्याच्या आवाहनाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. आणि अखेर भाजपाने सत्तेसाठीचे बहुमत मिळविलेच. एकूण ९५ पैकी ६१ जागांवर विजय संपादन करून भाजपाचे एकहाती सत्तेचे स्वप्न सत्यात उतरले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिळविलेल्या अहवालात भाजपा ६० ते ६५ जागा मिळविणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने मतदानाच्या आदल्या दिवशीच भाजपा सत्ता काबीज करणार असल्याचे संकेत मिळाले होते. परंतु भाजपाने बहुमत मिळविण्यासाठी मनी आणि मुनीचाच वापर करुन सत्ता मिळविण्यासाठी धर्माचाच आधार घेतल्याचा आरोप करीत त्याच्या चौकशीची मागणी देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती.

टॅग्स :Anil Desaiअनिल देसाई