शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘इको सेन्सिटिव्ह’ गावांबाबत गुरुवारपर्यंत हरकती नोंदवा

By admin | Published: April 25, 2017 12:59 AM

पालकमंत्र्यांचे आवाहन : पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक

कोल्हापूर : राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात परिसंवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सिटिव्ह झोन) समाविष्ट असलेल्या गावांसह त्यावर उपजीविका अवलंबून असलेल्या गावांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवार (दि. २७) पर्यंत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात समावेशीत गावांबाबत बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जि. प. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, वन्यजीव विभागीय वन्य अधिकारी सीताराम झुरे, वनविभागाचे पी. पी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्ह्यातील १८४ गावे डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या शिफारसीनुसार समाविष्ट आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनची प्रारूप अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने जारी केली आहे. शेती व शेती संलग्न व्यवसायावर बहुतांश गावांची उपजीविका अवलंबून असल्याने अनेक गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेशासाठी विरोध आहे. त्यामुळे या विषयावर गुरुवारपर्यंत हरकती सादर करणे आवश्यक असल्याने यथोचित कारणांसह वेळेत हरकती व सूचनांचे ठराव सादर करावेत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये राधानगरी या तालुक्याच्या ठिकाणासह अन्य महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व समावेशीत गावांचा फेर सर्व्हे करून जी गावे वगळणे आवश्यक आहे. ती गावे कोणत्या कारणांसाठी वगळावीत याबाबतची मागणी केंद्र सरकारकडे सादर करून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.