मुंबई : विभागाकडे आलेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वासंदर्भातील माहिती दिनांक २१ नोव्हेंबरपूर्वी सामान्य प्रशासन विभागाकडे द्या, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी सर्व विभागांना दिल्या.राज्य शासनाच्या सेवेतील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम व महामंडळे यामध्ये असलेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वा संदर्भातील बैठक मंत्रालयात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात सनियंत्रण करण्यासाठी शिक्षणमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तावडे म्हणाले की, सर्व विभागांनी माहिती देताना पदांची संख्या नमूद करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती दयावी. याशिवाय निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम/ महामंडळे यांची माहितीही अचूक दयावी. सर्व विभागांनी माहिती प्रमाणित करूनच २१ नोव्हेंबरपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे देणे आवश्यक असून, यानंतर याबाबत पुढील कार्यवाही सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येईल.
‘मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाची माहिती द्या’
By admin | Published: November 10, 2015 2:27 AM