रोहा : रोहा तालुक्यातील खाजणी गावातील महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना मागील डिसेंबर २०१३ मध्ये गावातीलच काही गुंडांनी मारहाण तसेच महिलेला विवस्त्र करून धिंड काढली होती. अशा बहिष्कृत तक्रारीची वेळीच दखल रोहा पोलिसांनी न घेतल्याने हा गंभीर मानहानीचा प्रसंग ओढवला असे ताशेरे राज्य मानवी हक्क आयोगाने ओढले असून रायगड जिल्हाधिकार्यांना या प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नेहमीच राजकीय हुजरेगिरीत रममाण असलेल्या रोहा पोलिसांना ही चांगलीच चपराक आहे, असे आता बोलले जात आहे. खाजणी गावात २३ डिसेंबर रोजी राजकीय द्वेषातून विधवा महिलेला विवस्त्र करून गावातून बहिष्कृत करण्याचे कृत्य गावातील गुंडांनी केले होते. याबाबत त्या महिलेने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. अखेर याची दखल मानवी हक्क आयोगाने घेत रायगड जिल्हाधिकार्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आणि या घटनेचे गांभीर्य समोर आले. रोहा पोलिसांची तक्रार दाखल आणि तपास कार्यक्षमता नेहमीच पक्षपाती राहिली आहे. काही ग्रामीण भागातील पुरुष, महिला, युवतींच्या तक्रारीकडे किरकोळ समजत दुर्लक्ष केले जाते आणि अशा गंभीर घटना घडतात. याचे हे उदा. आहे. त्यांच्या दुर्लक्षपणामुळेच अनेक गंभीर घटना घडल्या हे या प्रकारातून आता बोलले जाते. तर खाजणी प्रकरणात दुर्लक्ष करणार्या संबंधित पोलिसांवर काय कारवाई होणार? हे स्पष्ट झालेले नाही याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
मानवी हक्क आयोगाचे रोहा पोलिसांवर ठपका
By admin | Published: May 16, 2014 1:41 AM