कल्याण - काही दिवसापूर्वी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
कल्याणनजीक असलेल्या गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाच प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेला केंद्रीय मंत्री आठवले हे आज उपस्थित होते. या प्रसंगी भाजप आमदार किसन कथोरे, महाविद्यालयेच अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आणि रिपब्लीकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते. या शोकसभे पश्चात केंद्रीय मंत्री आठवले यांनी उपरोक्त वकव्य केले आहे. आठवले यांनी सांगितले की, कवाडे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या ऐक्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांशीशिवाय ऐक्य अशक्य आहे. त्यांना घेऊन ऐक्य केल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यास मी तयार आहे.
आंबेडकरांच्या पक्षात रिपब्लीकन नाव नसेल. मात्र त्यांचे काम रिपब्लीकन पक्षाप्रमाणेच आहे. यापूर्वीही रिपब्लीकन ऐक्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला फारसे यश मिळाले नाही. आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीत चांगली मते मिळाली. मात्र मते खाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे. निवडणूका लढवून त्यांनी सत्तेत यावे. मते खाण्याचे राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही या भाजपच्या भूमिकेशी सहमत असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रवादीला देशात मान्यता नाही. हा पक्ष महाराष्ट्रापुरता आहे. देशातील काही राज्यात शरद पवार यांचे संघटन आहे. उत्तर प्रदेशात जे भाजप सोडून गेले त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल. त्यांच्या सोडून जाण्याने भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप ३०० जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला भाजपला हरविणे ये-या गबाळ्य़ाचे काम नाही असा टोला आठवले यांनी समाजवादी नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे.