शितल धांडे
रिसोड ( वाशिम ), दि. 27 - शासकीय व निमशासकीय कार्यालयांना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे बंधन असतांनाही २६ जानेवारी रोजी रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात त्याचे पालन झाले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. रिसोड शहराच्या ह्रदयस्थानी असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या जागी जनपदच्या काळापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होते. सन १९९७ मध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोप येथे स्थानांतरीत करण्यात आले. यांनतर २००१ साली याच ठिकाणी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.जयप्रकाश बगडे यांनी आरोग्य विभागात पाठपुरावा करुन प्रायोगिक तत्वावर तालुका आरोग्य पथकाची स्थापना करुन कार्यालय कार्यान्वीत केले.
कार्यालय कार्यान्वित केल्यानंतर येथे नियमित ध्वजारोहण केल्या जात होते. पुढे २००५ पासून प्रायोगिक तत्वावर असलेल्या या कार्यालयाला शासनाने नियमित मान्यता दिली व या कार्यालयांतर्गत तालुक्यातील केनवड, मोप, कवठा, मांगुळझनक या चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दिला. या सर्व आरोग्य केंद्रातर्गंत २८ आरोग्य उपकेंद्र आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात सात कार्यालयीन कर्मचारी शासकीय निवासस्थानात राहतात. आठ ते दहा कर्मचारी वर्गांचे पुरेशे मनुष्यबळ, ध्वजारोहनासाठी ध्वजस्तंभासह मोठा खूला परिसर, कार्यालयाला वषार्काठी लाखो रुपयांचा साधील खचार्साठी येणारा निधी उपलब्ध असतानाही या कार्यालय परिसरत ध्वजारोहन करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली.
या संदर्भात तेथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ' नॉट रिचेबल ' आढळून आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर केंद्र पंचायत समिती अंतर्गंत येत असल्याचे सांगितले. त्यावरुन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते सुध्दा 'नॉट रिचेबल ' होते. अधिकारी संपर्क कक्षाच्या बाहेर४रिसोडच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा का झाला नाही, हे जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर वाघ आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मकासरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांचाही भ्रमणध्वनी संपर्क कक्षेत नव्हता. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे रिसोड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेतला असेल. -डॉ. दिपक सेलोकारजिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम