इंदुमती गणेश -- कोल्हापूर --‘मराठी चित्रपटसृष्टीची गंगोत्री’ ही बिरुदावली मिळालेल्या कोल्हापुरात संशोधकांना किंवा रसिकांना चित्रपटसृष्टीची एकत्रित माहिती कुठेही मिळत नाही. एकेकाळी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिलेल्या या कोल्हापूरचा चित्रपट इतिहास आता संशोधन केंद्राच्या रूपाने उपलब्ध होणार आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक कें द्राच्या वतीने हे चित्रपट संशोधन केंद्र साकारण्यात येत आहे.चित्रपटसृष्टीत भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, भारताचे पहिले सुपरस्टार, पहिले पोस्टर पेंटिंग, ‘प्रभात’ची सुरुवात असे सगळे पहिलेवहिले घडले ते कोल्हापुरात. आनंदराव पेंटर आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यापासून सुरू झालेल्या या उगमानंतर भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही. शांताराम, पुढे ‘प्रभात’ची स्थापना, संस्थानचा राजाश्रय मिळाल्याने आकाराला आलेले शालिनी सिनेटोन आणि कोल्हापूर सिनेटोन म्हणजे आताचा जयप्रभा स्टुडिओ अशा अनेक प्रवाहांनी कोल्हापूरने चित्रपटसृष्टीला समृद्ध बनविले. लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलावंत, नेपथ्य, रंग-वेशभूषा, तंत्रज्ञ असा स्वतंत्र उद्योग येथे उभा राहिला. त्यावेळी कोल्हापूर हेच चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र होते. १९३३ ते १९७५-८० हा काळ कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. दुर्दैवाने कोल्हापूरच्या या उज्ज्वल इतिहासाची एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही. एखाद्या चित्रपट व्यावसायिकाला, रसिकाला किंवा अभ्यासकांना कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची माहिती (हॅलो २ वर)मुलाखतीतून इतिहासाची मांडणीजुन्या पिढीतील चित्रपट व्यावसायिक म्हणजे या क्षेत्राचा चालताबोलता इतिहास मानले जातात. नव्या पिढीला त्यांच्याकडून कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कळावा यासाठी ज्येष्ठांच्या मुलाखती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सुभाष भुर्के, त्यागराज पेंढारकर यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी माई पेंढारकर, चंद्रकांत मांडरे यांच्या मुलाखतीदेखील उपलब्ध आहेत. काय असेल संशोधन केंद्रात?जुन्या काळातील चित्रपटांचे स्क्रिप्ट, कलाकार, निर्माते-दिग्दर्शकांमध्ये होणारे करारपत्र, दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाची नोटीस, वेळा, तालमी, १९३३ ते ७५ या काळातील चित्रपटांची कलाकार, दिग्दर्शक व चित्रपटांतील प्रसंगांची छायाचित्रे, चित्रपट, चित्रपटसृष्टीवर आधारित पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांची कात्रणे हा सगळा इतिहास येथे असणार आहे. शिवाय या सर्व दस्तऐवजांचे डिजिटाझेशन करण्यात येणार आहे. रसिकांच्या इच्छेनुसार त्यांची इच्छा असेल तो चित्रपट पाहण्याचीदेखील सोय येथे असेल.भालजींचे स्वतंत्र दालन संशोधन केंद्राचे काम सुरू असताना भालजी पेंढारकरांची सर्वाधिक माहिती मिळाली आहे. कोल्हापूर सिनेटोन (जयप्रभा स्टुडिओ) हस्तांतरणाची कागदपत्रे, भालजींचे चित्रपट, चित्रपटांच्या प्रसंगांची छायाचित्रे, करारपत्रे, स्क्रिप्ट यांचे संकलन असलेले स्वतंत्र दालन येथे साकारण्यात येत आहे. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास कायमस्वरूपी जपला जावा, नव्या पिढीला कोल्हापूरने चित्रपटक्षेत्राला दिलेल्या सुवर्णकाळाची माहिती मिळावी या उद्देशाने संशोधन केंद्र सुरू करण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे ही माहिती किंवा छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यांनी संस्थेशी संपर्क साधल्यास केंद्राच्या कामाला गती मिळेल. - श्रीकांत डिग्रजकर, सचिव, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रकोल्हापूरला फार मोठी चित्रपट परंपरा लाभली आहे. तिची जपणूक व नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी चित्रपट संशोधन केंद्र मोलाचे साहाय्यभूत ठरणार आहे. - प्रा. कविता गगराणी, प्रमुख, भालजी पेंढारकर चित्रपट संशोधन केंद्र
कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीवर होणार संशोधन
By admin | Published: April 23, 2017 12:41 AM