लॉस अँजेलिस : भारतातील शेतक-यांच्या आत्महत्यांमागे हवामान बदल हे कारण असल्याचा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला. अपेक्षित पीक न आल्याने शेतकरी आणखी गरिबीत ढकलला जात असल्याचेही यात म्हटले आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे आगामी काळात आत्महत्या वाढतील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.पिकांच्या हंगामात तापमानात एका दिवसात एक डिग्री सेल्सिअसची वाढ होते. त्यामुळे देशभरात दररोज सुमारे ६५ आत्महत्या होतात. यूसी बर्कलेचे संशोधक टेम्मा कार्लेटन यांनी म्हटले आहे की, हजारो लोक अशा उदास स्थितीचा सामना करत आहेत. हा प्रकार धक्कादायक आहे. हे नैराश्य आर्थिक स्थितीतून आले आहे. आपण याबाबत काहीतरी करू शकू.योग्य धोरण हजारो लोकांचा जीव वाचवू शकेल.शेतीच्या ऐन हंगामात वाढते तापमान आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ‘प्रोसिडिंग आॅफ द नॅशनल अॅकॅडमी आॅफ द सायन्स’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. १९८० पासून आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले व दरवर्षी १,३०,००० लोक आत्महत्या करतात. यातील ७ टक्के प्रमाण हे तापमानवाढीशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)
संशोधकांचा निष्कर्ष :शेतकरी आत्महत्या हवामान बदलांमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:32 AM