शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

आरक्षण आंदोलन तीव्र; राज्यभरात मराठा समाज उतरला रस्त्यावर! ८४ अटक, १५ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 12:16 PM

नागरिकांनी शांतता राखावी; पोलिस दलाच्या वतीने आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील उपोषणावर असताना त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन तीव्र झाले आहे. राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. विविध ठिकाणी हे आंदोलन शांततेत सुरू असून काही शहरांमध्ये मात्र जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, रास्ता रोकोही झाला अन् शांततेत मोर्चेही निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मराठा आरक्षणाची मागणी करत काही लोकांनी आमदारांसह माजी मंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच घरे, वाहने पेटवून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. माजलगावात पोलिसांवरही दगडफेक केली. याच अनुषंगाने जिल्हाभरात १५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात आतापर्यंत ८४ लोकांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरूच होती.  इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी, कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन आम्ही पोलिस दलाच्या वतीने करत आहोत, असे आवाहन बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.  संचारबंदी लागू असल्यामुळे मंगळवारी बीडमध्ये शुकशुकाट होता.

  • आरक्षणासाठी सात जणांच्या आत्महत्या- छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दिवसभरात सात तरुणांनी आत्महत्या केल्या असून तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • जरांगे दादांची काळजी घ्या!- माझ्या जरांगे दादांची काळजी घ्यावी, असे पत्र लिहून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठाणवाडी येथील शुभम अशोक गाडेकर (२४) याने  मंगळवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • आणखी एकाने संपविले जीवन- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाळू नारायण भोकरे (रा. धामणगाव) यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.
  • पंढरपूर तालुक्यात आत्महत्या- तारापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे माळी समाजातील विलास कृष्णा क्षीरसागर (वय ३०) या तरुणाने मंगळवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाच्या कार्यकत्यांनी विलासचा मृतदेह चौकात ठेवून आंदोलन केले.
  • ‘आम्ही जातो आमच्या गावा’- संगमनेर तालुक्यातील झोळे येथील सागर भाऊसाहेब वाळे (२७) याने मंगळवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यात ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा’ असे लिहिले आहे.
  • झाडावरून घेतली उडी- वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील अकोली शिवारात झाडावरून उडी घेत लिंबाजी धोंडिराम कदम (वय ४८) यांनी आत्महत्या केली आहे.
  • नदीत आढळला मृतदेह- गंगाखेड तालुक्यात मैराळ सावंगी (जि. परभणी) येथे अशोक जाधव (३०) यांनी आत्महत्या केली. ते मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय होते. गोदावरी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला.
  • बीडमध्येही आत्महत्या- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बाळासाहेब धरीबा पाचपुते (४६) यांनी आत्महत्या केली.
  • तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंकुश कोल्हे या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये एकाने पेटवून घेतले. त्यांच्यावर नांदेडमध्ये उपचार सुरू आहे.  तर सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न आहे.

एसटी बसेसची सेवा ठप्प

  • धाराशिव : जिल्ह्यातील संपूर्ण एसटी सेवा ठप्प, बसेस डेपोतच उभ्या होत्या.
  • लातूर : विभागात तीन दिवसांपासून एकही बस रस्त्यावर नाही, सव्वा कोटीचे उत्पन्न बुडाले. 
  • अहमदनगर : ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड, मंगळवारी ८० टक्के फेऱ्या बंद होत्या.
  • बुलढाणा : देऊळगाव मही येथे रास्ता रोको. जालना, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसेस स्थगित.
  • कोल्हापूर : शिरोळमध्ये बस फोडली, आंदोलनाचे लोण जिल्हाभर. 
  • सांगली : जत बंदला हिंसक वळण; मुचंडीजवळ कर्नाटक एसटी बसच्या काचा फोडल्या.
  • सातारा : गोंदवलेत एसटीवर दगडफेक.
  • रत्नागिरी : दहा जिल्ह्यांत होणारी एसटी बस वाहतूक बंद. 
  • सोलापूर : जिल्ह्यातील नऊ आगारांतील एसटी सेवा बंद.

एसटीच्या १,५२६ फेऱ्या रद्द

एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या मंगळवारी दिवसभरात १,५२६ फेऱ्या रद्द झाल्या. यातून विभागाचे ४८ लाख ८७ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. सणासुदीत जळगाववरून छत्रपती संभाजीनगर, पुणे एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

जळगाव बसस्थानकात नियंत्रण कक्ष

जळगाव एसटी विभागाने छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे येथे जाणाऱ्या एसटीच्या बस फेऱ्या सोमवारी सायंकाळपासून रद्द केल्या आहेत. बससंदर्भात माहितीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.

...अन् महामार्गावर दिले जेवण

नांदेड जिल्ह्यात अनेक भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जोरदार निदर्शने करत मराठा समाजबांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. आंदोलनामुळे खोळंबलेल्या वाहनचालकांसाठी आंदोलकांनी जेवणाची व्यवस्था केली अन् चक्क महामार्गावर पंगती बसल्या.

आधी आरक्षण, मगच पेपर

माण तालुक्यातील दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्णय घेतला. मंगळवारी शाळा भरेल, असे वाटत असतानाच सर्व मुले शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जमली.  घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचाही नाईलाज झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना आरक्षण नसेल तर शिकून तरी काय करायचे, आमची ऐपत नसल्याने, उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्यापेक्षा सरकारने आरक्षण द्यावे. दिले नाही तर पेपर पण नाही, शाळा पण नको, या भूमिकेशी आम्ही ठाम राहणार, असे सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड