शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
3
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
4
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
5
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
6
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
7
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
8
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
9
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
10
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
12
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
13
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
14
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
15
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
16
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
17
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
18
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न

सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची हंडी फुटेना; ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 6:46 AM

अद्याप साहसी खेळासाठी नियमावलीच तयार नाही.

मनोज मोघे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला त्याला ७ वर्षे उलटली तरी तो केवळ कागदावरच आहे. अद्याप साहसी खेळासाठी नियमावलीच तयार नाही. यामुळे स्पर्धा भरविण्यासाठी सरकारकडून या खेळाला अनुदान मिळू शकत नाही. कोणत्या निकषांवर नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचे, हे ठरत नाही तोपर्यंत गोविंदांना सरकारी नोकऱ्यांत खेळाडू म्हणून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. गोविंदांच्या विम्याचा प्रश्न मात्र, मार्गी लागला आहे.

साहसी खेळाचा दर्जा जाहीर करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाल्यानंतर क्रीडा विभागाने दहीहंडी समन्वय समितीला ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने नियमावली करण्यास सांगितली आहे. यात थरांची उंची, सुरक्षा उपाययोजना, स्पर्धेचे आयोजन, गोविंदा संघांची नोंदणी आदींचा समावेश होता. दहीहंडी समन्वय समितीबरोबरच दहीहंडी असोसिएशन ही संघटनाही अस्तित्वात आहे. या दोन्ही संघटनांना समन्वयाने ऑलिम्पिक असोसिएशनसोबत नियमावली तयार करावी लागेल. सरकारी पातळीवर या नियमावलीची छाननी होऊन त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. 

आरक्षण कोणत्या निकषावर द्यायचे?

दहीहंडी खेळात सहभागी होणाऱ्या संघातील खेळाडूंची संख्या निश्चित नाही. त्यासाठी नियमावलीही निश्चित नाही. कोणता संघ किंवा कोणता खेळाडू हा उत्तम आहे, हे ठरवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे सध्या तरी अशा प्रकारे अन्य खेळांनुसार गोविंदांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे शक्य नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

नियमांची लवकरच पूर्तता : समन्वय समिती

  • दहीहंडी हा साहसी खेळ ठरावा यासाठीची नियमावली लवकरच तयार होईल. या दहीहंडी उत्सवाआधीच ती अंतिम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
  • यामध्ये १४ वर्षांवरील गोविंदांनाच उंच थरावर परवानगी, चेस्टगार्ड, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टीहारनेस आदी खेळाडूंकडून स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होण्याचे हमीपत्र लिहून घेणे, वयोगट आणि त्यानुसार थरांची संख्या निश्चित करणे, स्पर्धेदरम्यान वैद्यकीय पथक, मॅट, पाण्याची व्यवस्था, मोबाइल शौचालय गाडी आदींचा समावेश असल्याचे समन्वय समितीचे बाळा पडेलकर यांनी सांगितले.
टॅग्स :Dahi HandiदहीहंडीGovernmentसरकारjobनोकरी