कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदावर पुन्हा एकदा ‘सर्वसाधारण महिला प्रवर्गा’चे आरक्षण राहिले. शुक्रवारी मुंबईत नगरविकास विभागाने सोडत पद्धतीने आरक्षणे जाहीर केली. सन २००५ सालापासून मधल्या अडीच वर्षांचा कालावधी वगळता कोल्हापूरच्या महापौरपदावर महिलांचेच आरक्षण राहिल्याने पुरुषांवर सतत अन्याय होत असल्याची भावना बळावत चालली आहे. दरम्यान, या आरक्षण सोडत पद्धतीवरच काहीजणांकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनुसूचित जाती, सर्वसाधारण, आर्थिक मागास अशा प्रवर्गातून सलग तीनवेळा महिलांसाठी महापौरपद आरक्षित राहिल्यानंतर पुन्हा चौथ्या वेळेस (पान ३ वर)२००५ पासून झालेले महापौरसन २००५ ते २०१० पहिला अडीच वर्षे सर्वसाधारण महिला आरक्षण. महापौर झाल्या सई खराडे.दुसरी अडीच वर्षे सर्वसाधारण पुरुष. महापौर झाले उदय साळोखे व सागर चव्हाण. सन २०१० ते २०१५पहिली अडीच वर्षे - इतर मागास महिला आरक्षण. महापौर झाल्या - मनीषा बुचडे, कादंबरी कवाळे, जयश्री सोनवणे.दुसरी अडीच वर्षे - सर्वसाधारण महिला आरक्षण. महापौर झाल्या - प्रतिभा नाईकनवरे, सुनीता राऊत, तृप्ती माळवी, वैशाली डकरे. सन २०१५ ते २०२० पहिली अडीच वर्षे - इतर मागास महिला आरक्षण. महापौर झाल्या - अश्विनी रामाणे, हसिना फरास.दुसरी अडीच वर्षे - सर्वसाधारण महिला आरक्षण.
पुन्हा महिला आरक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2017 12:05 AM