बारामती : आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली. राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ अशा शब्दोच्चाराचा गैरफायदा घेऊन समाजाला विकासापासून वंचित ठेवले आहे. आता आरक्षणाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर आजच्या निर्धारसभेत प्रमुख नेत्यांनी लावला.
बारामती येथे झालेल्या निर्धार सभे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाच्या स्तरावर येणा:या सर्व अडचणी दूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’
राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, ‘‘ या समाजाच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची पदे दिली. त्यांच्याकडून मते घेतली. मात्र धनगर समाजाला विकासापासून दूर ठेवले.’’ जानकर यांनी विविध पक्षात काम करणा:या समाजातील नेत्यांवर देखील जोरदार टिका केली. दबाव आणल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर नेहमी दुटप्पी भूमिका सरकारने घेतल्याचे सांगितले.
कृती समितीचे नेते बाळासाहेब गावडे म्हणाले, ‘‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद केली. परंतु, जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी याच राज्यात झाली नाही. 6क् वर्षापासून शब्दोच्चाराचा फायदा घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आहे. 24 जुलैर्पयत त्यांना मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्यास कार्यकर्ते उग्र आंदोलन करतील. त्याची जबाबदारी राज्य शासनावर राहील, असा इशारा दिला.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, डॉ. विकास महात्मे, आमदार रामदास वडकुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांची भाषणो झाली.
कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी 25 जुलैर्पयत धरणो आंदोलन, उपोषणाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव घेण्यास विरोध..
4या सभेत धनगर आरक्षणाचाच मुद्दा महत्त्वाचा ठरला. आमदार अनिल गोटे यांनी अन्य राजकीय विषयाला हात घातला. मात्र, कार्यकत्र्यानी त्यांचे भाषण बंद पाडले.
4पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित तरुणांनी ‘या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही ’ असे सांगून त्यांचे भाषण बंद पाडले.
4भरणो यांनी अखेर त्यांचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा पुढे भाषण करण्यास संधी दिली.
बारामतीत लाखोंच्या संख्येने धनगर बांधव
बारामतीत निर्धार सभेच्या निमित्ताने राज्यभरातून 2 लाखांहून अधिक जनसमूदाय उपस्थित राहिला. शहरातील इंदापूर चौकाला अहिल्यादेवी चौक असे नामकरण करण्यात आले.
काटेवाडीत मेंढय़ांचे रिंगण..
आरक्षण दिंडी भवानीनगर वरून बारामतीकडे येताना काटेवाडीत अहिल्यादेवींच्या रथाभोवती मेंढय़ांचे वैशिष्टय़पुर्ण रिंगण पार पडले. आरक्षण दिंडीने सकाळी भवानीनगर येथून बारामतीकडे प्रस्थान केले.