ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ : मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे. ही गाडी राज्यशासनाच्या पूर्वीच्या मागणीनुसार, 31 जुलै पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र, लातूर मधील दुष्काळी स्थिती अद्यापही कायम असल्याने या गाडीसाठी आणखी महिन्याभराची मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गाडीची मुदत संपण्यास अवघा आठवडा शिल्लक असतानाही शासनाकडून मुदतवाढीची मागणी करण़्यात न आल्याने ही गाडी बंद करण्यात येणार होती. ही बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्यशासनाने याची दखल घेत. मंगळवारी (दि.27) रोजी याबाबतचे पत्र रेल्वे प्रशासनास पाठवत ही गाडी आणखी एक महिना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज मिरजहून लातूरसाठी 100 वी गाडी रवाना करण्यात आली. यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रमुख बी.के दादाभॉ़य यांनी ही गाडी पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले
जलदूतला 31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ
By admin | Published: July 28, 2016 5:09 PM