शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

रुग्णांसाठी मर मर मरायचे, वेतन मात्र काॅलेजने लाटायचे; ‘खासगी’ निवासी डॉक्टरांची कैफियत

By संतोष आंधळे | Published: August 25, 2023 5:56 AM

विद्यावेतन द्या नाहीतर कारवाईला सामाेरे जावे लागेल: वैद्यकीय आयाेगाचा इशारा

संतोष आंधळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना जेवढे विद्यावेतन (पगार) मिळते तेवढेही आम्हाला मिळत नाही. उलट जे विद्यावेतन आम्हाला मिळते तेही महाविद्यालयाचे प्रशासन आमच्याकडून काढून घेते, असे गंभीर आक्षेप देशातील नवोदित डॉक्टरांनी घेतले आहेत. निमित्त ठरले राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने खासगी महाविद्यालयांतील पदव्युत्तर निवासी डॉक्टर आणि पदवीधर डॉक्टर यांना किती विद्यावेतन  दिले जाते, यासाठी केलेल्या सर्व्हेचे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वरील विषयावर गुगल ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. त्यात विद्यावेतनासंदर्भात उद्वेगजनक मुद्दे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगाने सर्व खासगी मेडिकल कॉलेजांच्या प्रशासनाला शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना जेवढे विद्यावेतन दिले जाते तेवढेच खासगी मेडिकल कॉलेजातील निवासी डॉक्टरांनाही देण्याचे आदेश दिले आहेत. नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशाराही आयोगाने दिला आहे. वैद्यकीय आयोगाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण बोर्डाचे उपसचिव औजेंदर सिंग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र गुरुवारी काढण्यात आले आहे.

विद्यावेतनातील तफावत गंभीर

  • महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात विद्यावेतन मिळण्यावरून अनेकवेळा निवासी डॉक्टर संप करत असतात. मात्र देशातील खासगी रुग्णालयांतील अनेक निवासी डॉक्टरच्या विद्या वेतनाविषयावरून मोठी तफावत आहे. 
  • या सर्व प्रकरणाची वैद्यकीय आयोगाने गंभीर दखल घेतली असून यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन न 
  • देणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सर्व्हेमध्ये काय?

  • आयोगाने केलेल्या सर्व्हेमध्ये देशभरातून एकूण १०,१७८ विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. 
  • त्यात ७९०१ उत्तरे  देणारे विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पोस्ट ग्रॅज्युएट निवासी डॉक्टर आहेत. 
  • ७९०१ विद्यार्थी हे १९ राज्यांतील २ केंद्रशासित प्रदेशातील आणि  २१३ महाविद्यालयांतील आहेत.
टॅग्स :doctorडॉक्टरcollegeमहाविद्यालय