शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

खारेपाटण संभाजीनगर येथे खासगी आरामबसला अपघात, २७ प्रवासी जखमी; ७ जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 8:52 PM

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला सकाळी ६.२० वाजता मोठा अपघात झाला. तीन पलटी खाऊन सुमारे १५ फूट खाली खोल झाडीत गाडी गेली.

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला सकाळी ६.२० वाजता मोठा अपघात झाला. तीन पलटी खाऊन सुमारे १५ फूट खाली खोल झाडीत गाडी गेली. यामध्ये एकूण २७ प्रवासी जखमी झाले असून ७ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, परळ-मुंबई येथून शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता बबन मल्हार (सावंतवाडी) यांच्या मालकीची विशाल ट्रॅव्हल्स (क्रमांक एम. एच. ०४, जीपी ००४५) ही खासगी बस बसचालक अली इस्माईल शेख (५२) हा सावंतवाडी-बांदा येथे घेऊन जात होता. खारेपाटण संभाजीनगर येथे महामार्गावर समोरून येणा-या एका खासगी ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे व ओव्हरटेक केल्यामुळे बस चालकाने गाडी वाचविताना साईडपट्टीचा अंदाज न आल्याने सुमारे १५ फूट खोल झुडपात कोसळून ती पलटी झाली.या अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच संदेश धुमाळे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना तातडीने गाडीतून बाहेर काढून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे तसेच खासगी डॉक्टर डॉ. प्रसाद रानडे व डॉ. वडाम यांनी जखमी प्रवाशांवर उपचार केले. अपघातात अशोक गोविंंद पवार (५२, जवळेथर), सयाजी कृष्णा पवार (५८, जवळेथर, राजापूर), अर्जुन संभाजी कदम (४६), हिम्मतराव गोविंद कांबळे (५५), शुभांगी रामचंद्र सावंत (३२), सरिता रामचंद्र सावंत (५४), यशोदा जयसिंग जाधव (६२, सर्व राहणार साळिस्ते, कणकवली), रमाकांत तातू धुरी (६२, शेर्ले, सावंतवाडी), दर्शना महादेव पाष्टे (२९, सावंतवाडी), मनोहर गोविंद जाधव (५२, वारगांव), भाग्यश्री रमाकांत धुरी (६२, शेर्ले, सावंतवाडी), तृप्ती एकनाथ धुरी (१९, शेर्ले, सावंतवाडी), भरत साहेबराव केंद्रे (३०, लातूर), हेमंत मोहन कांबळे (२७, साळीस्ते, कणकवली), विलास रावसाहेब लाडे (३०, बीड), स्वप्नील सुरेश साळीस्तेकर (२७, साळीस्ते), सतीश रामचंद्र मेस्त्री (२५, ओसरगाव), शाहू धोंडू पाटील (२४, सावंतवाडी), सचिन मोहन मेस्त्री (४०, ओसरगाव), अली ईस्माईल शेख (बसचालक, ५२, सातारा), भगवान विठ्ठल जाधव (५९, वारगांव), दीपक मुकुंद पवार (४२, जवळेथर, राजापूर), कृष्णा रमाकांत धुरी (२१, शेर्ले, सावंतवाडी), मनोहर सोनू मेस्त्री (५५, ओसरगाव), सुनीता चंद्रकांत मेस्त्री (४६, ओसरगाव), योगिता चंद्रकांत मेस्त्री (२७, ओसरगाव), मिलिंद भिकाजी कांबळे (४२, चिंचवली) असे एकूण २७ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी अशोक गोविंद पवार, सयाजी कृष्णा पवार (जवळेथर, राजापूर), अर्जुन संभाजी कदम, हिम्मतराव गोविंद कांबळे, शुभांगी रामचंद्र सावंत, सरिता रामचंद्र सावंत, यशोदा जयसिंग जाधव (सर्व राहणार साळीस्ते, कणकवली) या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर तसेच डोक्याला मार लागल्यामुळे पुढील उपचाराकरीता त्यांना कणकवली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. खारेपाटण टाकेवाडी येथे एक दिवसापूर्वीच रामेश्वर ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले होते. रविवारी दुस-यांदा पुन्हा खारेपाटण येथे अपघात झाला आहे. त्यामुळे खारेपाटण हे आता अपघाताचे गाव म्हणून ओळखले जात आहे.खारेपाटण हे मुंबई-गोवा महामार्गावर व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे गाव असून तेथे सातत्याने केव्हाही रात्री-अपरात्री अपघात होत असतात. मात्र तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर काम करीत असल्यामुळे अपघातावेळी तारांबळ उडते. तरी अशा महत्त्वाच्या ठिकाणी दोन डॉक्टरांची गरज आहे. मात्र आम्हांला गंभीर परिस्थितीवेळी खासगी डॉक्टराची मदत घ्यावी लागते. प्रशासनाने याचा विचार करावा.- रमाकांत राऊत (नवनिर्वाचित सरपंच, खारेपाटण)

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग