बुलडाणा, दि. २८- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ह्यसामनाह्ण या दैनिकामध्ये मराठा मूक मोर्चाबाबत प्रकाशित एका व्यंगचित्रावरून मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्यावर मंगळवारी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व सिंदखेडराजाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर व मेहकरचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सोपविले. यासंदर्भात बुधवारी सकाळी या तिघांनाही ह्यमातोङ्म्रीह्णवर बोलविण्यात आले होते. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राजीनामे मागे घेतले असल्याची माहिती आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. मातोङ्म्रीवर झालेल्या चर्चेत ह्यसामनाह्ण या दैनिकामध्ये काढण्यात आलेले ते व्यंगचित्र हे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच त्या व्यंगचित्राचे व्यंगचित्रकार यांनी माफी मागितली आहे, हे स्पष्ट करण्यात आले, त्यामुळे हा विषय संपवत राजीनामे मागे घेण्यात आले आहेत. खासदार जाधव व आमदार डॉ.खेडेकर यांच्यासोबत ह्यमातोङ्म्रीह्णवर गेलो होतो. तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. व्यंगचित्रकाराने माफी मागितल्यामुळे राजीनामे परत घेतले आहेत. -डॉ.संजय रायमुलकर, आमदार मेहकर.
शिवसेनेतील राजीनामानाट्य संपुष्टात!
By admin | Published: September 29, 2016 1:55 AM