शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

मुलींच्या तंत्रनिकेतन कॉलेज बंदला विविध संघटनांचा विरोध

By admin | Published: December 27, 2016 9:48 PM

महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 27 - महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत. मात्र भाजप सरकारने को-एज्युकेशनच्या नावाखाली लातूरचे महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याला लातुरातील विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शैक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. महिला कॉलेज बंद पाडून बेटी कैसे पढेगी असा संतप्त सवाल संघटनांनी केला आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची ओळख देशभरात झाली. या शैक्षणिक हबमुळे २५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने लातूरला शासकीय महिला तंत्रनिकेतन सुरू केले. या आठ वर्षांच्या कालावधीत महिला तंत्रनिकेतनने तंत्रशिक्षणात गुणवत्ता प्रस्थापित केली. मात्र पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देऊन शासनाने महिला तंत्रनिकेतनमध्ये को-एज्युकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र महिला महाविद्यालयाऐवजी मुला-मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला तंत्रनिकेतनचे रुपांतर होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून को-एज्युकेशन करण्याचा निर्णय शासनाचा आहे. त्याला लातुरातील विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी विरोध केला असून, शैक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. स्वतंत्र महिला तंत्रनिकेतन बंद करून स्त्री शिक्षणाबाबतची उदासिनता असल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून केला जात आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ४०० जागा शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये होत्या. आता को-एज्युकेशन होत असल्यामुळे त्यात गुणवत्तेने प्रवेश मिळून मुलींच्या प्रवेशाचा टक्का कमी होणार आहे. शिवाय, स्वतंत्र मुलींचे तंत्रनिकेतन असल्यामुळे प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती शासकीय तंत्रनिकेतनला असायची. मात्र आता ती सोयच राहणार नसल्याने पालक वर्गातून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जात आहे. स्त्री शिक्षणाला चालना देण्याऐवजी महाविद्यालय बंद करून मुलींच्या शिक्षणाची गळचेपी करण्याचाच हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मुलींनी व्यक्त केल्या.निर्णय अन्यायकारक... महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या मुलींवर मोठा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया वैष्णवी पांडे या विद्यार्थिनीने दिली. स्त्री शिक्षणाला अडसर... जाहिरातबाजीतून ह्यबेटी पढाओह्णची घोषणा शासन करते. तर दुसरीकडे राज्यातील तीन महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा स्त्री शिक्षणाला विरोध दिसतोय, असे रेणुका नाईक म्हणाली.आंदोलन उभारणार... महिला तंत्रनिकेतन बंद केल्यामुळे मुलींच्या शिक्षणाला मोठा ह्यखोह्ण बसणार आहे. या धोरणामुळे मुलींवर अन्याय होणार आहे. हे तंत्रनिकेतन बंद पडू नये, यासाठी आम्ही आंदोलन उभे करू, असे पल्लवी भुरे हिने सांगितले. तंत्रनिकेतन सुरूच ठेवावे... शासनाच्या नवीन धोरणानुसार हे तंत्रनिकेतन बंद झाल्यास ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का घटणार आहे. त्यामुळे हे तंत्रनिकेतन सुरू राहणे गरजेचे असल्याचे स्नेहा सोमवंशी म्हणाली.अडचण होणार...महिला तंत्रनिकेतन निवासी असल्यामुळे आई-वडील मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी पाठवीत होते. मात्र आता हे तंत्रनिकेतन मुला-मुलींचे झाल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रिया शिंदे म्हणाली.गरिबांसाठी चांगली सोय... तंत्रनिकेतनमधील सर्व शैक्षणिक खर्च शासन करीत आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत. तंत्रनिकेतन बंद झाल्यास  शिक्षणाचे प्रमाण घटेल, असे सरस्वती जाधव म्हणाली.चुकीचा निर्णय... तंत्रनिकेतनचे को-एज्युकेशनमध्ये रुपांतर करून शासन काय साध्य करणार आहे, माहीत नाही. पण हा निर्णय चुकीचा आहे. त्यासाठी आंदोलन करू, असे अनुजा जाधव हिने सांगितले. शासनाचा विरोध करू... मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेले हे तंत्रनिकेतन बंद केल्यास विद्यार्थिनींच्या वतीने एकत्रित येऊ. शासनाच्या या धोरणाचा विरोध करू, असे गीतांजली माने म्हणाली.