पुणे :पुण्याने मागील पाच वर्षात भाजपा शिवसेनेच्या महायुतीला प्रचंड यश दिले आहे. हाय क्वालिटी एज्युकेशन पुण्यात दिसत आहेत. पुण्यातील लोक जगभरात जाऊन पुण्याचे नाव गाजवत आहेत. यावेळी भाजपाला शहरातील 8 जागा मिळतील. तसेच 220 जागांचा संकल्प पुर्ण होणार आहे. फडणवीस सरकारने देशातील सर्वात जास्त इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राज्यात आणले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पुण्यात आलेले असताना माध्यमांशी बोलत होते. गोयल म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी पुण्यात सभा घेतली. त्यासभेतही मोदी यांनी पुणेकरांचे आभार मानले. पण ते मोठ्या लोकांचे अपुरे राहिलेले काम करत आहेत. महात्मा गांधी अजूनही भारताला हवे आहेत. हे मागच्या 5 वर्षात मोदींनी दाखवले. ते भ्रष्टाचार मुक्त भारत करत आहेत. देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे. फडणवीस सरकारने देशातील सर्वात जास्त इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राज्यात आणले आहेत. आता कुठे काश्मीर से कन्याकुमारी देश एकत्र झाला. फुले यांचे ही काम मोदी करत आहे.देशहित सोडून ते पक्षहित पहात होते. त्यांच्या काळात व्याजदर, ऊद्योग यांची अवस्था काय होती हे त्यांनी सांगायला हवे. महागाई वित्तीय तूट कमी केली आम्ही, म्हणून तर लोकांनी परत सरकार निवडून दिले.
........
अर्थव्यवस्था आम्ही सक्षम करणारच.. ५ ट्रिलियन मधील १ ट्रिलियन महाराष्ट्राचा असेल. निवडणुक एकतर्फी सुरू आहे. लोकांचा उत्साह पाहिला की हे दिसते. मला आश्चर्य वाटते ते मनमोहनसिंग यांचे. त्यांनी देशाला ज्या लाचारीच्या अवस्थेत सोडले होते, त्यानंतर आता देश किती बदलला, समर्थ झाला हे त्यांच्यासारख्या मोठ्या अर्थतज्ञाला कसे समजत नाही. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला. त्यांच्या डोळ्यासमोर किती घोटाळे झाले, पण त्यांनी काही केले नाही.