शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

…अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:22 AM

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौरा प्रसंगी विमानतळ ते प्रकल्प यादरम्यान  काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची योजना आंदोलकांनी आखली होती

नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे नामकरण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होत असताना दुसरीकडे आदिवासी संघटनांच्या जनसभेत या विषयावरून प्रचंड आक्रोश सुरू होता. तब्बल चार तास चाललेल्या या जनसभेत गोंडवाना-गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय असा ठराव मंजूर करून या नावानेच पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा मुंबईत झाल्यापासूनच नागपूरसह विदर्भातील आदिवासी समाज संघटना आणि नागरिकांकडून विरोध सुरू आहे. सोमवारी नामकरण समारंभाचे औचित्य साधून येथील राजे भक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यासमोर जनसभा झाली. त्यात  हा ठराव घेण्यात आला.

माजी महापौर मायाताई इवनाते यांच्या पुढाकारातून झालेल्या या सभेला आ. डॉ. अशोक उईके, आ. डॉक्टर संदीप धुर्वे, आ. डॉ. देवराव होळी, राजे वीरेंद्र शहा ऊईके, माजी आमदार संजय पुराम, अरविंद गेडाम, प्रभुदास भिलवेकर, रमेश मावसकर, मधुकर उईके, दिनेश शेराम, हरि उईके,  अमित कोवे, राजेंद्र मरस्कोल्हे, एम.एम. आत्राम, प्रकाश गेडाम, रंजीता कोडापे, आकाश मडावी, विवेक नागभिडे आदी उपस्थित होते.

काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळलामुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौरा प्रसंगी विमानतळ ते प्रकल्प यादरम्यान  काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची योजना आंदोलकांनी आखली होती.  यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होती. दरम्यान काटोल नाक्यावर काही युवकांनी गोळा होऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याची तयारी चालवली. मात्र पोलिसांच्या लक्षात येताच सर्वांना ताब्यात घेऊन हा प्रयत्न हाणून पडला.

मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रणप्रकल्पाचे उद्घाटन झाल्यावर मुख्यमंत्री आंदोलकांच्या पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतील, असा निरोप पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सभा स्थळापर्यंत पोचवण्यात आला. मायाताई इवनाते यांच्याकडे हा निरोप गेला, मात्र व्यासपीठावरील नेत्यांनी आणि इवनाते यांनी  या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. शिष्टमंडळ भेटीला जाणार नाही.  परंतु मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी येऊन सर्व समाज बांधवांची संवाद साधावा, अशी भूमिका  मांडण्यात आली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे