यवत : यवत येथे चुकीच्या ठिकाणी झालेला भुयारी मार्ग आणि भांडगाव येथे रद्द करण्यात आलेला भुयारी मार्ग यावरून लोकमत आपल्या दारी उपक्रमात चांगलीच राजकीय खडाजंगी होऊन सर्वपक्षीय पुढा-यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.यवत येथे पुणे सोलापूर महामार्गाच्या मुख्य लेनच्या बाजूने लोखंडी बॉरीगेट लावण्यात आल्यानंतर एस.टी.बस सेवा रस्त्याने येत नसल्याने वृद्ध नागरिक व महिलांचे मोठे हाल सुरु आहेत.यावर ठोस उपाय योजना करण्याची मागणी भारिपा बहुजन महासंघाचे दौड़ तालुका अध्यक्ष उत्तम गायकवाड़ यांनी केली.तर सेवा रस्ता पुर्णत: अतिक्रमण मुक्त ठेवावा अशी मागणी राहुल अवचट यांनी केली. यावर उत्तर देताना उपसरपंच सुभाष यादव यांनी याबाबत संबधित अधिकारी वर्गाबरोबर ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे.यापुढे यात आणखी लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.तर भांडगाव येथील भुयारी मार्ग रद्द झाल्यानंतर त्यासाठी त्यावेळी आंदोलन करणारे भाजपाचे पदाधिकारी आता भाजपा सत्तेत आल्यानंतर काय प्रयत्न करत आहेत असा प्रश्न रामदास दोरगे यांनी उपस्थित केला.यावर भाजपाचे दौड़ तालुका अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे व माजी तालुका अध्यक्ष रविंद्र दोरगे यांनी याबाबतचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यकडे केला आहे.त्यांनी सदर उड्डाण पुलाला लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. याच वेळी भांडगाव येथील राहुल खळदकर यांनी त्यावेळी सत्तेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांच्यावर भुयारी मार्ग रद्द केल्याचा आरोप केला.याला माजी उपसरपंच नितीन दोरगे यांनी उत्तर देताना भांडगाव येथे भुयारी मार्ग करण्यास आमचा विरोध नाही मात्र उड्डाण पुल करण्यास विरोध असल्याचे सांगितले.(वार्ताहर)
पाण्याचा प्रश्न मार्गी लावू
By admin | Published: May 18, 2016 1:15 AM