शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचा संकल्प, ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 4:15 AM

‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ या अभिनव उपक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई : विद्यापीठ व शासन स्तरावरील शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा. तसेच, त्यांच्या सेवापुस्तिका, शासनाकडून वेळोवेळी मिळणारे लाभ, वेतन, निवृत्ती वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ त्वरित मिळणे अशा आनुषंगिक बाबींसाठी व प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा व्हावा यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत ‘उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ या अभिनव उपक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.  हा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाने शासनास विनंती केली होती, त्याचाच परिपाक म्हणून शिबिराचे आयोजन केले आहे.

तीन टप्प्यांत कार्यशाळांचे आयोजनविद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, फक्त औपचारिकता म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला नाही. यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी तीन टप्प्यांत या कार्यशाळांचे आयोजन सर्व दहा परिक्षेत्रातील सहसंचालक कार्यालयांमार्फत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहसंचालक कार्यालय, दुसऱ्या टप्प्यात संचालक कार्यालय आणि तिसऱ्या टप्प्यात शासन स्तरावर ही प्रकरणे निकाली काढली जाणार असल्याचे राज्याचे उच्चशिक्षण संचालक प्रा. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील