लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. विशेष करून अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे असे जिल्हे किंवा शहरात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय आढावा घेऊन ठरवू. कारण कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढत असल्याची प्रशासनाकडून आकडेवारी येत आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध कडक करायचे का, हे येत्या आठ दिवसांत ठरवू, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (corona patient increasing in some district of Maharashtra.)
राज्यातील मुख्यतः अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अशा जिल्ह्यांतील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत आहोत. त्यामुळे आणखी आठ दिवस आढावा घेण्यात येईल. त्यानंतर गरज आहे, त्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
लोणावळ्यात ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावाराज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी तसेच समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी येत्या २६ आणि २७ जूनला लोणावळा येथे मेळावा घेणार आहे. त्यात विविध गोष्टींची चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. इतर मागास वर्ग समाजातील नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
दारुबंदीवरून अभय बंग यांच्यावर उपरोधिक टीकाn राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि तुमच्यावर टीका केली, त्यावर वडेट्टीवार म्हणाले, अभय बंग हे महान सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत. n त्यांच्या अफाट प्रयत्नामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्यामुळे एकही माणूस तंबाखू अथवा सिगारेट पित नाही. n त्यामुळे त्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची टिप्पणी वडेट्टीवार यांनी केली.
केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावीn मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आणि ओबीसींची देशपातळीवर जातनिहाय जनगणना केल्यास सर्वांनाच न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. n मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही आडकाठी आणू नये, अशी विनंती त्यांनी केली.