मुंबई : मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून अनेक शक्कल लढविल्या जात आहेत. यात मुंबई उपनगरीय मार्गांवरील मेल-एक्स्प्रेस सुटणाऱ्या टर्मिनसवर प्रवाशांसाठी एसी (वातानुकूलित) विश्रामगृह (डॉरमिटरी रूम)उभारले जात असून, सीएसटी येथे आणखी एक एसी विश्रामगृह मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. या विश्रामगृहाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा, यासाठी बारा तासांसाठी अवघे १५0 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेच्या सीएसटी, एलटीटी येथून मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस सुटतात, तर ठाणे, कल्याण येथे अनेक ट्रेनला थांबा देण्यात येतो. त्यामुळे या स्थानकातून ट्रेन पकडणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेने एसी विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या चारही स्थानकांवर प्रत्येकी एक एसी विश्रामगृह उभारण्यात आले. यातील ठाणे स्थानकातील विश्रामगृहाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे, तर कल्याणमधील विश्रामगृहाला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे ते बंद करण्यात आले. फक्त सीएसटी आणि एलटीटी येथील विश्रामगृहाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. त्यामुळे सीएसटी येथे आणखी एक विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने तयार करण्यात आलेल्या विश्रामगृहात पुरुषांसाठी ५४ तर महिला प्रवाशांसाठी २0 बेडची सोय करण्यात आली आहे. यात १२ तासांसाठी १५0 रुपये, तर २४ तासांच्या कालावधीसाठी २५0 रुपये दर आकारण्यात येतील. तिकीट निश्चित असलेल्या प्रवाशांसाठीच ही सुविधा असेल. या विश्रामगृहाचे बुकिंग ६६६.१ं्र’३ङ्म४१्र२े्रल्ल्िरं.ूङ्मे वर १२0 दिवस आधी प्रवाशांना करता येणार आहे. आॅनलाइनद्वारे बुकिंग केलेल्या विश्रामगृहाची प्रिंट सादर करावी लागेल. >विश्रामगृहात आॅनलाइन बुकिंगनव्याने तयार करण्यात आलेल्या विश्रामगृहात पुरुषांसाठी ५४ तर महिला प्रवाशांसाठी २0 बेडची सोय करण्यात आली आहे. यात १२ तासांसाठी १५0 रुपये, तर २४ तासांच्या कालावधीसाठी २५0 रुपये दर आकारण्यात येतील. तिकीट निश्चित असलेल्या प्रवाशांसाठीच ही सुविधा असेल. या विश्रामगृहाचे बुकिंग ६६६.१ं्र’३ङ्म४१्र२े्रल्ल्िरं.ूङ्मे वर १२0 दिवस आधी प्रवाशांना करता येणार आहे. प्रवाशांना विश्रामगृहात प्रवेश मिळविण्यासाठी आॅनलाइनद्वारे बुकिंग केलेल्या विश्रामगृहाची प्रिंट सादर करावी लागणार आहे.
सीएसटीत एसी विश्रामगृह
By admin | Published: August 24, 2016 1:51 AM