शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

दहावीचा निकाल फुगतोय!

By admin | Published: June 10, 2015 2:16 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी- बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले. परंतु,गेल्या काही वर्षांपासून दहावी बारावीचा निकाल फुगत चालला आहे. याबाबत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. तोंडी परीक्षेत संंबंधित शळा- महाविद्यालयांकडे २० गुणांचा अधिकार दिल्याने त्यातील बहुतांश गुण मिळतात. त्यामुळे ५ गुण मिळाले तरी ग्रेस गुणांच्या सहाय्याने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (सीबीएसई) राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ८०-२० पॅटर्न आणला. त्यामुळे विद्यार्थ्यांची २० गुणांची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे सोपविण्यात आली. ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याची जबादारी राज्य मंडळाकडे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या निकालात दरवर्षी सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. यंदा दहावी बारावीच्या निकालाने नव्वदी ओलांडली. फेब्रुवारी / मार्च २०१५ चा बारावीचा निकाल ९१.२६ टक्के लागला. केवळ ८.७४टक्के विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले तर दहावीचा निकाल ९१.४८ टक्के लागल्याने फक्त ८.५४ टक्के विद्यार्थी नापास झाले.दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार ५८३ आहेत. बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी ९७ हजार ४२९ आहेत. त्यामुळे आपला मुलगा-मुलगी खरचं एवढे हुशार आहेत का? असा प्रश्न पालकांंना पडू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळत आहेत. मात्र,आता मार्च २०१६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण मिळविणे बंधनकारक केले आहे. परिणामी काठावार पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटणार आहे. त्यामुळे आपोआप दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात केवळ राज्य मंडळाच्याच नाही तर सीबीएसई ,आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा इन हाऊस पद्धतीने घेतल्या जात आहेत. उत्तरपत्रिकाही सैल हाताने तपासल्या जातात. परीक्षा निकोप पद्धतीने घेणे गरजेचे आहे. वाढत चालेल्या निकालावर शिक्षण तज्ज्ञांनी गांभीर्याने विचार करावा. - श्रीधर साळुंके, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण

शैक्षणिक वर्ष २०१५- १६ पासून नववी ते बारावीपर्यंच्या लेखी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना८० पैकी किमान 16 गुण मिळविण्याचे बंधनकारक आहे. राज्य मंडळातर्फे प्रत्येक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांला १५ ग्रेस गुण दिले जातात. त्यात एका विषयाला जास्तीत जास्त १० आणि केवळ तीन विषयांसाठी विभागून १५ग्रेस गुण दिले जाऊ शकतात. तर अंध व अपंग विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण सर्व विषयांना विभागून दिले जातात.  - कृष्णकुमार पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकेवळ दहावी बारावीच नाही तर एम.ए.पर्यंतच्या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षक सढळ हाताने गुण देत असल्याचे निकालावरून दिसून येते. बहुतांश मुलांना २० पैकी २० गुण मिळतात. त्यातही हुशार मुले ८० पैकी ७० गुण प्राप्त करतात. त्यामुळे अनेक मुलांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. आता ८० पैकी किमान १६ गुणांची अट घातल्याने काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांंमध्ये घट होईल.परंतु, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांवर परिणाम होणार नाही.- वसंत काळपांडे, माजी संचालक, राज्य शिक्षण मंडळ

राज्य मंडळाने लेखी परीक्षेत ८० पैकी किमान १६ गुण मिळविण्याचे बंधन घालून धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षी निकालात काही प्रमाणात घट होईल.परंतु,ही मर्यादा २४ गुणांपर्यंत वाढविण्याची आवश्यकता आहे.- वसंत वाघ, माजी प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज, पुणे