अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नगर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के लागला. यात पुणे विभागात नगर दुसऱ्या स्थानावर असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्क््यांनी निकाल घसरला. सोमवारी दुपारी दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षेसाठी जिल्ह्यातून ४० हजार ४८३ मुले, तर ३० हजार ७७२ मुली असे एकूण ७१ हजार २५५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ३७ हजार १३९ मुले, तर २९ हजार ७ मुली असे एकूण ६६ हजार १४६ विद्यार्थी (९२.८३) उत्तीर्ण झाले. मागील वर्षी हाच निकाल ९५.४३ टक्के होता. म्हणजे त्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यंदा मुलांचा निकाल ९१.७४, तर मुलींचा निकाल ९४.२६ टक्के लागला. जिल्ह्यातील १९ हजार ९५८ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय २७ हजार ५०४ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १६ हजार ५६७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. २ हजार ११७ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले.अकरावी प्रवेशासाठी १३ ला प्राचार्यांची बैठकअहमदनगर : दहावीचा निकाल सोमवारी आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. या निकालात जिल्ह्यातील १८० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पोले यांनी दिली आहे. जिल्ह्यातील दहावीचा निकालाचा टक्का यंदा २ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच सोबत शंभर टक्के निकाल असणाऱ्या शाळांची आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत २१९ वरून १८० पर्यंत खाली आली आहे. १५ जूनला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या शाळेत मूळ गुणपत्रिका आणि कल चाचणीचा निकाल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता ६३ हजार ५२० असून प्रत्यक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६६ हजार १४६ आहे. दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजची वाढलेली संख्या, आयटीआयसह अन्य प्रवेशाकडे कल वाढलेला आहे. यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखामध्ये प्रवेशासाठी अडचण निर्माण होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.वाणिज्य आणि शास्त्र शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्ह्यात वाणिज्य विभागाच्या ७ हजार ९६० जागा यासह १ हजार ३६० स्वयं अर्थसहाय्यितच्या जागा असून शास्त्र विभागाच्या २४ हजार ३६० जागा असून ३ हजार ७०७ स्वयं अर्थ सहाय्यितच्या जागा आहेत. यामुळे अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी १३ जूनला माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक फिरोदिया शाळेत होणार असल्याचे पोले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तालुकानिकालाचा टक्काशेवगाव ९५.१०जामखेड ९४.५९नगर तालुका ९४.२२कर्जत ९३.७४राहुरी ९३.३७राहाता ९३.२३श्रीगोंदा ९३.२०नेवासा ९३.१८संगमनेर ९३.१८पाथर्डी ९२.२८अकोले ९१.७६पारनेर ९१.५१कोपरगाव ९०.११श्रीरामपूर ८९.२४मुलींनी परंपरा राखलीबारावीपाठोपाठ यंदा दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. मागील वर्षीपेक्षा जिल्ह्याचा एकूण निकाल घसरला असला तरी मुलांपेक्षा (९१.७४ टक्के) मुलीच (९४.२६ टक्के) सरस ठरल्या आहेत. पुणे विभागात मुलींचे स्थान दुसरे आहे. जिल्ह्यातील ९६३ विद्यालयांमधून ७१ हजार २५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यंदा जिल्ह्यात शेवगावचा सर्वाधिक ९५.१० टक्के निकाल लागला असून, श्रीरामपूर मागील वर्षीप्रमाणे यंदाही निचांकी (८९.२४) स्थानावर आहे. मागील वर्षी ९५ टक्केच्या पुढे १२ तालुके होते. यंदा मात्र शेवगाव वगळता सर्व तालुक्यांचा निकाल ९० ते ९५च्या दरम्यान आहे. ४मागील दोन वर्षांच्या तुलनेत मुलांप्रमाणेच मुलींचा निकालही घसरला आहे. परंतु तो मुलांपेक्षा अधिक आहे. यंदा मुलींचा निकाल ९४.२६, तर मुलांचा ९१.७४ टक्के लागला.
जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2016 11:40 PM