पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.फेरपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. आॅनलाइन निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होणार होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, त्याची तारीख मंडळाकडून स्वतंत्रपणे कळविली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या निकालाची गुणपडताळणी करायची आहे. त्यांना ३० आॅगस्ट २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळण्यासाठी ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये अर्ज करता येतील. फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे.
दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:20 AM