शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

निवृत्त पोलीस कर्मचारी, कुटुंबीयांना मोफत उपचार

By admin | Published: May 02, 2017 4:36 AM

महाराष्ट्राचे संरक्षण करण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतरही पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय

कोल्हापूर : महाराष्ट्राचे संरक्षण करण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतरही पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून १२०० आजारांवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. येथील पोलीस उद्यानामध्ये उभारलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांची उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. त्यांना घरं बांधून देण्याची योजना राबवण्यात येत आहे. जीवनातील मौल्यवान असे क्षण पोलीस जनतेसाठी देत असतात. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम दल असून, या दलाचे गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. चंद्रकांत पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांनी या तिरंग्याच्या रूपाने एक चांगली भेट महाराष्ट्राला दिली आहे, असे सांगत फडणवीस यांनी या तिरंग्याने कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकल्याचे सांगितले. या भव्य अशा तिरंग्याकडे पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची, क्रांतिकारकांची आठवण होते, परंपरेची जाणीव होते आणि ३०३ फुटांच्या या ध्वजाकडे मान उंच करून पाहिल्यानंतर ऊर भरून येतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यापुढच्या काळात इथल्या अंबाबाईला दर्शनासाठी येणारे या हा झेंडा पाहून आपली देशभक्ती जागवतील, असे ते म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अवकळा आलेल्या पोलीस उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. लोकांच्या सहकार्यातून हा तिरंगा उभारण्यात आला. शाहू महाराजांनी अनेक गोष्टी करून ठेवल्या. परंतु आम्ही नवीन काही केलं नव्हतं. म्हणूनच ही सुरुवात केली. कोल्हापुरात येणारा पर्यटक दोन दिवस इथं राहावा यासाठी प्रयत्न असून इथे फुलपाखरांचे संग्रहालयही करणार असल्याचे त्यांनी घोषित केले. या वेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पोलीस कल्याण निधीसाठी पुणे जनता बँक, उद्योगपती संजय घोडावत, चाटे शिक्षण समूह यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘भारत के वीर’ची जन्मकथाअक्षयकुमार याने सुरू केलेल्या ‘भारत के वीर’ या अ‍ॅपची जन्मकथा अक्षयकुमार याने सांगितली नाही. मात्र नंतर बोलणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती सांगितली. दहशतवादी कसे तयार केले जातात याची चित्रफीत ‘बीबीसी’वर दाखवली जात होती. तुम्ही ठार झालात तरी तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेऊ याची खात्री या दहशतवाद्यांना दिली जाते. मग दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या सैनिकांना याची कोण खात्री देणार? ही खात्री देण्यासाठीच अक्षयकुमार यांनी हे अ‍ॅप तयार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.अक्षयकुमार हेलिकॉप्टरने तिरंगा फडकवणार होतेआपल्या भाषणात फडणवीस यांनी अक्षयकुमार हे हेलिकॉप्टरमधून हा तिरंगा फडकवणार होते. परंतु, वेळेमुळे ते शक्य झाले नसल्याचे सांगितले. अक्षयकुमार हे स्वत: स्टंट करतात. त्यांना आम्ही नाराज करणार नाही. आम्ही पुढे जेव्हा असा तिरंगा तयार करू तेव्हा अक्षयकुमार यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून तिरंगा फडकवण्यात येईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अक्षयकुमार यांनी दिल्या घोषणामुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण सुरू करण्याआधी तीन वेळा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. त्याला उपस्थितांनीही मोठा प्रतिसाद दिला. तर अक्षयकुमार यांनी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘शाहू महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. त्या वेळीही उपस्थितांनी जोरदार आवाजात प्रतिसाद दिला. मी तर भाग्यवान - अक्षयकुमारअक्षयकुमार म्हणाला, मी मूळचा पंजाबचा आहे. मात्र आज महाराष्ट्र दिनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बसण्याचा मान मिळाला. रात्री २ वाजता झोपून पुन्हा सकाळी ७ वाजता उठून महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री काम करत आहेत, यासाठी त्यांचे अभिनंदन करू या, असे आवाहन अक्षयकुमार यांनी केले. प्रत्येक पोलीस मैदानामध्ये असा तिरंगा फडकला पाहिजे, अशी अपेक्षा त्याने या वेळी व्यक्त केली. देशातील १२५ कोटी जनता सैनिकांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी ‘भारत के वीर’ हे अ‍ॅप तयार केले असून, नागरिकांच्या पाठबळामुळे ते लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहे. ध्वजस्तंभाची वैशिष्ट्ये३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे वजन २४ टन, ध्वजस्तंभाचा बेस ५ फूट, तिरंगा ध्वज ९0 फूट लांब व ६० फूट रुंद म्हणजे ५४०० चौरस फुटांचा आहे. उंचावरील वाऱ्याच्या झोताने ध्वजाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. तसेच रात्रीच्या वेळी हा ध्वज विद्युत रोशणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे. ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे. उद्यान व ध्वजस्तंभाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सात कर्मचारी ठेवले जातील. दोन पोलीस शिपाई २४ तास पहारा देतील. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माहिती सांगण्यासाठी प्रशिक्षक ठेवला जाणार आहे. या ध्वजस्तंभाचा महिना ७० हजार रुपये देखभाल येणार खर्च आहे.