शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 9:30 PM

देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़. 

ठळक मुद्देगोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताशनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसगेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु

पुणे : मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरु केला असून राजस्थान, कच्छ व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून तो माघारी परतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे़. गेल्या वर्षी २०१७ मध्ये मॉन्सूनच्या माघारीला २७ सप्टेंबरला सुरुवात झाली होती व तो संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला माघारी गेला होता़.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. मराठवाड्यात हवामान कोरडे होते़ पेण १२०, कर्जत ६०, माथेरान, वैभववाडी ५०, भिवंडी, दाभोलीम, कुडाळ, मुल्दे, केपे, संगमेश्वर, देवरुख ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. मध्य महाराष्ट्रात श्रीरामपूर ४०, आजरा, चंदगड, गडहिग्लज, कोरेगाव, नेवासा, पेठ, संगमनेर, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस झाला होता़. देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.  येत्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून सर्वसाधारणपणे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास १ सप्टेंबरपासून सुरु होत असतो़. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु होऊ लागला आहे़. २०१७ मध्ये मान्सूनची माघारी २७ सप्टेंबरपासून सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो २४ आॅक्टोबरला माघारी गेला आणि संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला परतला होता़. २०१६ मध्ये त्यांच्या माघारीस १५ सप्टेंबरला सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो १६ आॅक्टोंबरला आणि संपूर्ण देशातून २८ आॅक्टोंबरला माघारी गेला होता़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भRajasthanराजस्थानGujaratगुजरात