आकोट (अकोला) : आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी हरीश खडसेंना सत्र न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला. हरीश हे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे आहेत. आकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बांधकाम व इतर विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर यांनी आकोट शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला होता; मात्र गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे ४0६, ४२0, ४६७, ४६८, ४७१, ४७७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवार ३ जुलै रोजी आरोपी हरीश खडसे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी याप्रकरणी सभापती रमेश हिंगणकर, मोहसीनबेग मिर्झा तसेच कंत्राटदार सुनील अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
महसूल मंत्री खडसेंच्या पुतण्याला जामीन
By admin | Published: July 03, 2015 11:17 PM