शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

खरिपाचा आढावा तोच; फक्त वर्ष वेगळे

By admin | Published: May 21, 2016 1:11 AM

खरीप हंगामाचा आढावा तोच आहे, फक्त वर्ष वेगळे आहे. यात बदल व्हायला हवा.

भोर : खरीप हंगामाचा आढावा तोच आहे, फक्त वर्ष वेगळे आहे. यात बदल व्हायला हवा. पुरेशा प्रमाणात बियाण्याचे वाटप करुन चारसूत्री पद्धत, युरिया ब्रिकेटचा वापर करुन तालुक्यातील भाताची लागवड वाढली पाहिजे तरच पिकात वाढ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे गरजेचे आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.राज्य शासन कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१६/१७ नियोजन व आढावा सभेचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी थोपटे बोलत होते. या वेळी जि.प. अध्यक्ष प्रदीप कंद, कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, जि.प. सदस्या तृप्ती खुटवड, तहसीलदार वर्षा शिंगण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सभापती नंदा शेडगे, उपसभापती रोहिणी बागल, माजी सभापती रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, सतीश चव्हाण, सुर्वणा मळेकर,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, मंडल अधिकारी हनुमंत खाडे, उपअभियंता जाधव, कृषी अधिकारी जयेश भुतपल्ले, सरपंच ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.खरीप हंगामाकरिता पुरेशा प्रमाणात खते, बी-बियाणे उपलब्ध करुन दिली जातील मात्र शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असल्यास लेखी स्वरुपात दिल्यास संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल. मात्र शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे असे कंद यांनी सांगितले.प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची सविस्तर महिती दिली.शेतकऱ्यांना माफक दरात वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात धान्य उपलब्ध करुन दिल्यास चांगले पीक येईल त्याचबरोबर अनेक गावात भाताची शेती कमी आहेत अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे प्रशिक्षण देऊन प्रोेत्साहन द्यावे अशी मागणी रणजित शिवतरे यांनी केली.महाबीजच्या जांभेकर व महाजन यांनी कंपनीच्या वतीने खरीप हंगामासाठी १६०० क्विंटल बियाणांची गरज असून ८०० क्विंटल बियाणाचे वाटप झाले आहे. उर्वरित बियाणे मे महिनाअखेर पुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगितले.या वेळी वंदना धुमाळ, तृप्ती खुटवड यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जयेश भुतपल्ले यांनी मानले.