मुंबई / पुणे : राज्याच्या काही भागांत वाढलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या संभाव्य वेळापत्रकामध्ये सुधारणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया आता २६ जुलैपासून सुरू केली जाणार आहे, असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.सुरुवातीला विद्यार्थ्यांना १६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरून नोंदणी करता येणार होती. मात्र आता शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या क्षेत्रांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.उपसंचालक कार्यालयांनी अकरावी प्रवेशाची कार्यवाही सुधारित वेळापत्रकाप्रमाणे करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ँ३३स्र२://े४ेुं्र.11३ँंे्रि२२्रङ्मल्ल.ङ्म१ॅ.्रल्ल या संकेतस्थळावर येत्या २६ तारखेपासून नोंदणी करता येईल.२६ जुलैला सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात आॅनलाइन नोंदणी, प्रवेश अर्ज (भाग १) भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक यांनी स्वत: ही प्रक्रिया करायची आहे किंवा पालक शाळांची मदत घेऊ शकतात. सोबतच अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र निवडणे यासाठी हा टप्पा असणार आहे. २७ जुलैपासून संबंधित शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांना विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज प्रमाणित करता येतील. यादरम्यान अर्जामध्ये काही त्रुटी किंवा आवश्यकता असल्यास विद्यार्थ्याशी संपर्क साधता येणार आहे.दहावीच्या निकालानंतर पुढील कार्यवाहीराज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग २ भरायचा आहे. यामध्ये प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून सबमिट आणि लॉक करायचा आहे. विद्यार्थ्यांना हा अर्ज कधीपर्यंत भरता येईल याचा कालावधी दहावीच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल.
अकरावीच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर, प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 4:35 AM