जळगाव : पोलीस निरीक्षकाने दारुच्या नशेत वाळू व्यावसायिकावर रिव्हॉल्वर रोखून त्याला धमकाविले. वाळू व्यावसायिकाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर त्यांनी प्रकरणाची खात्री करुन या पोलीस अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना केली.रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारे वाळूचे डंपर अडवून पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी दारुच्या नशेत वाळू व्यावसायिकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखविला. ‘लोकमत’ने सादरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता तर पोलीस ठाण्यातून ते सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर हद्दीतून वाळू वाहतुकीच्या बदल्यात दरमहा मोठ्या रकमेचा हप्ता वाळू व्यावसायिकांकडून पोलिसांना देण्यात येतो. सादरे यांनी रविवारी वाहने अडवून पैसे मागितले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने सादरे यांनी रिव्हॉल्वर रोखले. (प्रतिनिधी)
हप्त्यासाठी रिव्हॉल्वर रोखले!
By admin | Published: May 05, 2015 1:02 AM