अतुल कुलकर्णी मुंबई : साता-याचे जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे हे आपण बोलावलेल्या बैठकीला रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते, पण आपण त्यावर आक्षेप घेतल्यानंतर ते त्यांनी बाहेर ठेवले, अशी तक्रार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर खोत यांनी कृषीमंत्र्यांना भेटून ही तक्रार केली. ते म्हणाले, सदर अधिकारी बैठकीत काही प्रश्न विचारले तर खूर्चीवर रेलूनबसत. दोन्ही पाय हलवत उत्तरे देतात, त्यांना मंत्र्यांचा मान ठेवण्याचेही भान नाही.अधिकारी असे वागत असतील तर ते खाली काम काय करत असतील, असे सांगून संबंधित अधिकाºयाची तातडीने बदली करावी, अशी मागणीही खोत यांनी केली.यावर फुंडकर म्हणाले, आपल्याकडे देखील संबंधीत अधिकाºयाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. आता स्वत: राज्यमंत्रीच अशी गंभीर माहिती देत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.संबंधीत अधिकाºयाची बदली केली जाईल, असे आश्वासन त्यांना फुंडकर यांनी दिले.
रिव्हॉल्व्हर घेऊन अधिकारी बैठकीला!
By अतुल कुलकर्णी | Published: November 08, 2017 5:23 AM