शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण

By admin | Published: April 06, 2017 12:45 AM

वडगाव शेरी-चंदननगर परिसरात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे.

चंदननगर : वडगाव शेरी-चंदननगर परिसरात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे. यामुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा भरते व सुटतेवेळी अशा रोडरोमिओंना उधाण येत असून शाळा, महाविद्यालयीन परिसरात असे तरुण बिनधास्तपणे वावरत असल्याचे चित्र वडगाव शेरी-चंदननगर परिसरातील दिसून येत आहे.वडगाव शेरी-चंदननगर भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर काही खासगी व सरकारी शाळा असून, या शाळांच्या परिसरात टार्गट मुलांचा त्रास विद्यार्थिनींना होत असल्याचे दिसून येत आहे. एका दुचाकीवर तिघेजण बसून कर्कश्श हॉर्न वाजवणे, भरधाव वाहन चालवत मुलींना कट मारून निघून जाणे, असे प्रकार दररोज घडत आहेत.वडगाव शेरी, चंदननगर भागातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी येणारी नजीकच्या भागातील व उपनगरांतील मुलींची संख्या मोठी आहे. मुलींना बसने प्रवास करावा लागतो. बसस्थानकाडे चालण्याच्या रस्त्यावर येताच रोडरोमिओ मोठ्यासंख्येने हिरोगिरी करतात. वर्गामध्येही काही मुले असे प्रकार करत असून, त्यांना बाहेरील मुलांचाही पाठिंबा मिळत असतो.चंदननगरमधील संत तुकाराम महाविद्यालय व शाळांच्या दोन्ही गेटवर रोडरोमिओ नजरा रोखून बसलेले पहावयास मिळतात. वडगाव शेरी, जुना-मुंढवा रस्ता, कल्याणीनगर, पाचवा मैल, विमाननगर, आनंदपार्क, खराडीगाव, खुळेवाडीगाव, वडगाव शेरी, विमाननगर येथील शाळा- महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंचा ठिय्या असतो. बुलेट राजांचा त्रासशाळा व महाविद्यालय परिसरात बुलेट राजांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसाढवळ्या शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस संस्थेच्या सर्व दरवाजांसमोर ही टपोरी मंडळी घोळक्याने उभी असतात आणि सर्वांच्या समोर मुलींची छेड काढतात. पोलिंसाचा कानोसा लागताच हे रोडरोमिओ धूम ठोकतात. चंदननगर बाजार परिसरात एका मुलीचे नाव रस्त्याच्या कडेच्या भिंतीवर ठळकपणे लिहिले होते. त्यामुळे त्या मुलीला आणि तिच्या परिवारातील लोकांना नाहक त्रास झाला होता. त्या वेळी सचिन सातपुते यांनी तक्रार देऊन पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली होती. वडगाव शेरीतील एका शाळेतील पीटी शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.भाजी मंडई टार्गेट...चंदननगर भाजीमंडई, शिवाजीमहाराज पुतळा, जुनी भाजीमंडई, वडगावशेरी गावठाणातील भाजीमंडई, गणेशनगर या मंडईमध्ये दररोज हजारो महिला व मुली मंडई खरेदीसाठी येत असतात. त्यावेळी हे रोडरोमिओ मंडईच्या आजूबाजूला घोळक्याने थांबतात व शेरेबाजी करतात. गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त असावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.