शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

समृद्ध कलांचा वारसा लाभलेले ‘यड्राव’

By admin | Published: July 10, 2017 12:49 AM

समृद्ध कलांचा वारसा लाभलेले ‘यड्राव’

घ:नशाम कुंभार । लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : यड्रावनगरीच्या मातीमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, समाजकारण, राजकारण, उद्योग, व्यवसाय यांची जडणघडण होऊन त्यांचा नावलौकिक राज्याबाहेर झाला. अशा सर्वच क्षेत्रांत येथील ग्रामस्थांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. इ.स. १८२२ (शके १७४५) साली तत्कालीन कोल्हापूर दरबारचे सरंजामी सरदार धोंडिबा यांना करवीर सरकारातून दहा हजारांची तैनात मिळाली व त्या तैनातीच्या वसुलीकरिता मौजे यड्राव पेठा हातकणंगलेसह इतर सहा गावे सरंजामी म्हणून मिळाली. सरकार घराण्याचा वारसा लाभलेल्या यड्रावमध्ये सन १९५३ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली. जयसिंगपूर बाजारपेठेमध्ये कर्नाटक भागातून शेतीमाल बैलगाडीतून विक्रीसाठी येताना यड्राव येथे बैलगाड्यांचा मुक्काम होत असे. मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जयसिंगपूर बाजारपेठेत जाऊन बैलगाड्या परतीच्या प्रवासाला लागत असत. बैलांचा कर्नाटकातून जयसिंगपूर बाजारपेठ ते परत कर्नाटकपर्यंतचा प्रवास हा जादा अंतराचा असल्याने बैलांची तब्बेत चांगली राहावी. त्यांची क्रियाशक्ती मजबूत होऊन सुदृढता येण्यासाठी मोकळ्या बैलगाड्यांपैकी कोणती बैलगाडी जयसिंगपूर बाजारपेठेतून यड्रावपर्यंत पहिली येते, त्या गाडीस प्रोत्साहन म्हणून विठ्ठलराव आनंदराव नाईक-निंबाळकर सरकार यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी पहिल्या येणाऱ्या गाडीस बक्षीस देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून बैलगाडी शर्यतींचा प्रघात सुरू झाला. बैलगाडी शर्यतीस सुरुवात करणारे गाव असा यड्रावचा लौकिक आहे. यड्रावमध्ये विठ्ठलराव आनंदराव नाईक-निंबाळकर, आप्पासाो नाईक-निंबाळकर, नरसगोंडा पाटील, गणपती कुंभार, बाळू कोळी, वसंत डकरे, शिवाजी पाटील यांच्यासह अनेकांनी बैलसंपत्ती जपली. येथील बैलजोड्यांनी कर्नाटक-महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या बऱ्याच शर्यतीमध्ये आपल्या कार्यशैली व सुदृढतेचा ठसा उमटविला आहे. कलाविष्कारातही यड्राव आघाडीवर आहे. नवजीवन नाट्यमंडळाच्या माध्यमातून शंकर प्रभावळकर, मधुकर जांभळे, दिलावर मिरजकर, गणपती कदम, बापू कोकाटे, दगडू भोसले यांनी व रत्नदीप कला, क्रीडा, नाट्य मंडळाच्या माध्यमातून राजाभाऊ उर्फ आर. एस. कुंभार, जे. एस. पाटील, व्ही. पी. सदलगे, टी. बी. पासोबा, डी. बी. पिष्टे, धनंजय शेट्टी, तुकाराम मोहिते, दगडू भोसले यांनी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाची छाप उमटवून अनेक बक्षिसे पटकाविली. येथील जयहिंद मंडळ, विश्वशांती, विवेक क्रीडा मंडळ, देवराज स्पोर्टस्, रत्नदीप क्रीडा मंडळ, राजेंद्र पाटील अकॅडमी या माध्यमातून कबड्डी खेळावर लक्ष दिले. डी. के. पाटील, सुरगोंडा पाटील, बापू लोखंडे, रजाक मुजावर, बी.एम.दानोळे, बापू कोकाटे, शिवा कोडणे, बापू आळते, जयसिंग माने, पुंडलिक जाधव, शिवाजी दळवी यांनी क्रीडा कौशल्याचा ठसा उमटविला. यापैकी बऱ्याच जणांनी लेझीम व दांडपट्टा खेळामध्ये उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केले होते. बापू काकडे, लहू ठाणेकर, जोतीराम ठाणेकर, वसंत झुटाळ, शंकर कांबळे, शिवाजी जगताप, जालिंद काकडे या पैलवानांनी तालीम व व्यायामाच्या माध्यमातून शरीरसंपदा व कुस्तीचे कसब प्राप्त केले. शामराव पाटील-यड्रावकर यांनी राज्य पातळीवर विविध क्षेत्रात आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे जिल्हा बँकेचे संचालक व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांनी शिरोळ पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. तर राजवर्धन नाईक-निंबाळकर हे सध्या जि. प. सदस्य आहेत. कै. विष्णू कांबळे यांनी जि.प. तर मंगल कांबळे यांनी पं.स.चे सदस्यत्व भूषविले आहे. माजी सरपंच सरदार सुतार यांना यशवंत सरपंचपदाचा सन्मान मिळाला. तर माजी सरपंच लक्ष्मीकांत लड्डा व उल्हास भोसले यांनी व विद्यमान उपसरपंच विजय पाटील यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. १९६८ साली तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते येथे कोल्हापूर जिल्हा शेतकरी, विणकरी सहकारी सूतगिरणीची स्थापना दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुढाकाराने व शामराव पाटील-यड्रावकर, धोंडोजीराव नाईक-निंबाळकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या सहकार्याने झाली. यामुळे हजारो बेरोजगारांना काम मिळाले व संस्थेस पूरक विविध उद्योग व रोजगार निर्मिती झाली.यड्राव एज्युकेशन हब : यड्रावमध्ये कन्या विद्यामंदिर, कुमार विद्यामंदिर, पार्वती विद्यामंदिर, अल्फोन्सा स्कूल, पोदार स्कूल, दि न्यू हायस्कूल, एसपीवाय हायस्कूल, शरद प्ले स्कूल, शरद कॉमर्स कॉलेज, शरद आयटीआय, शरद पॉलिटेक्निक, शरद इंजिनिअरिंग अशी बालवाडीपासून ते अभियांंत्रिकी शिक्षणापर्यंतचा अभ्यासक्रम याठिकाणी इंग्रजी व मराठी माध्यमातून मिळत असल्याने यड्राव एज्युकेशन हब बनले आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी २५०० वृक्षलागवडपार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसाहतीमध्ये २ हजार ५०० वृक्षांची लागवड करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधील कापड उद्योग प्रक्रियेतून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून साडेचार एकर जागेत बांबू लागवडीचा प्रकल्प राबवून प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारीही उद्योजकांनी घेतली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादनशील असलेल्या उद्योगात काम करण्यासाठी देशातील विविध राज्यांतून कामगार येत आहेत. यामुळे पार्वती औद्योगिक वसाहत जणू राष्ट्रीय एकात्मतेचाच संदेश देत असल्याचे दिसत आहे. यामुळे इतर राज्यातील रीतीरिवाज व परंपरांची ओळख होत आहे. त्याचबरोबर येथील बंधुभाव व सलोख्याचे दर्शन होत आहे.संरक्षण दलास टर्किश टॉवेल पार्वती औद्योगिक वसाहतीमधील इचलकरंजी टेक्स्टाईल प्रा.लि.मधून टर्किश टॉवेलचे उत्पादन केले जाते. या टॉवेलचा गुणवत्ता व निकषाच्या आधारावर भारताच्या संरक्षण विभागातील एअरफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, एअर इंडिया यांना पुरवठा होतो. याचबरोबर अमेरिका, इस्राईल, फ्रान्स या देशांना टॉवेलची निर्यात होते. यड्राव येथे सन १९८१ मध्ये पार्वती औद्योगिक वसाहतीची स्थापना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व सहकाररत्न शामराव पाटील-यड्रावकर यांच्या संकल्पनेतून साकारली. २६६ एकरांमध्ये सहकार तत्त्वावरील आशिया खंडातील सर्वांत मोठ्या असलेल्या या वसाहतीमध्ये २५० उद्योग कार्यरत आहेत. या वसाहतीत प्रामुख्याने टेक्स्टाईल-पॉवरलूम्स, अ‍ॅटोलूम्स, वार्पिंग, निटिंग, कॉटन फॅब्रीक्स, टर्कीश टॉवेल, सिंथेटीक प्रोसेस, सॉक्स उत्पादन. इंजिनिअरिंग- युनिव्हर्सल टेक्स्टिंग, एम. एस. पाईप, फॅब्रीकेशन, सीएनसी, व्हीएमसी मशिन्स. रबर व पीव्हीसी-पीव्हीसी पाईप, आदी सेवा मिळतात. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन यासह वीसहून अधिक उत्पादनांचा परदेशी बाजारपेठेत नावलौकिक आहे.