ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - ग्राहक पंचायतीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे मुंबईमध्ये रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ उद्यापासूनच लागू होणार आहे. आधीच्या सरकारने नेमलेल्या हकीम समितीच्या शिफारशीनुसारच सध्यातरी रिक्षा व टॅक्सीचे भाडे ठरवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यामुळे रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ अपेक्षित होती. मात्र, ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत या वाढीला विरोध दर्शवला होता.
हायकोर्टाने भाडेवाढीला हिरवा कंदील दाखवला असल्याने उद्यापासूनच ही भाडेवाढ लागू होणार आहे. सध्या असलेले रिक्षाचे किमान भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये होईल तर टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे. सर्व रिक्षांना व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू करण्यासाठी अापले इलेक्ट्रॉनिक मीटर री-कॅलिब्रेट करावे लागणार आहेत.