शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार रिक्षा परवाने !

By admin | Published: March 26, 2016 1:27 AM

कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला रिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला

- सचिन लाड,  सांगलीकर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला रिक्षा परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विधवा पत्नींनी एक लाखाचे सानुग्रह अनुदान घेतले आहे, त्यांनाच रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. याची सर्व जबाबदारी आरटीओंकडे सोपविण्यात आली आहे. आरटीओंनी परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून विधवा पत्नींची यादी मागविली आहे.कर्जास कंटाळून किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची सांगली जिल्ह्यातही मोठी संख्या आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला तातडीने एक लाखाचे सानुग्रह अनुदान दिले जाते. पण हे अनुदान आयुष्यभर पुरणारे नसते. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांंनी त्यांच्या जमिनी गहाण ठेवलेल्या असतात. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. यासाठी शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना रिक्षा परवाने देण्याची योजना सुरू केली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आरटीओंना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सांगलीचे आरटीओ दशरथ वाघुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून, ज्या विधवा महिलांनी पतीच्या आत्महत्येनंतर लाखाचे अनुदान घेतले आहे, त्यांची यादी देण्याची मागणी केली आहे. यादी मिळाल्यानंतर परवाने देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. महिलांना परवाने देण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच किती परवाने द्यावेत, याचे कोणतेही बंधन नाही. ज्या शेतकऱ्याची शेती होती आणि त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीस शासनाकडून लाखाचे सानुग्रह अनुदान मिळाले आहे, त्याच महिलेस रिक्षा परवाना दिला जाणार आहे. स्वत: महिला जरी पुढे आल्या नाहीत तरी आरटीओ कार्यालय त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. शासनाच्या या योजनेतून किती महिलांचा रिक्षा परवाने मिळाल्यानंतर संसार फुलला, याची माहिती संबंधित जिल्ह्याच्या आरटीओंना शासनाकडे सादर करावी लागणार आहे. या योजनेचे पालकत्व आरटीओंकडे सोपविण्यात आले आहे. रिक्षा घ्यावी लागणार!रिक्षा परवाने मिळाल्यानंतर ते करार पद्धतीने भाड्याने देता येणार नाहीत, अशी अट शासनाने घातली आहे. परवाने मिळाल्यानंतर त्यांना रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. रिक्षा खरेदी केल्यानंतर त्यांनी ती स्वत: न चालविता भाडेतत्त्वावर चालक ठेवायचा आहे. रिक्षा घेण्यासाठी सव्वा ते दीड लाखाची रक्कम पाहिजे. याचीही शासनाने सोय केली आहे. रिक्षा परवाने घेतलेल्या विधवा महिलांना कोणतीही अट न लावता कर्जपुरवठा करण्याची सूचना राज्यातील सर्व बँकांना केली आहे. दररोज हप्ता :खात्यावर जमारिक्षावर भाडेतत्त्वावर चालक म्हणून काम करणाऱ्या चालकाने या महिलेला दररोज किती हप्ता द्यायचा? हे सुरुवातीला ठरवून घ्यायचे आहे. त्यानंतर हप्त्याची दररोजही रक्कम महिलेच्या बँक खात्यावर जमा करायची आहे. चालक नियमित हप्ता जमा करतो की नाही, याची तपासणी करण्याचे काम आरटीओंकडे सोपविण्यात आले आहे.