शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

रिक्षा-टॅक्सी, बसचालकांच्या मनमानीला बसणार चाप

By admin | Published: February 27, 2017 1:43 AM

प्रवाशांशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी,आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात मुंबईकरांकडून टोल फ्री हेल्पलाइनवर नेहमीच तक्रारींचा पाऊस पाडला जातो

मुंबई : प्रवाशांशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी,आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात मुंबईकरांकडून टोल फ्री हेल्पलाइनवर नेहमीच तक्रारींचा पाऊस पाडला जातो. टोल फ्री हेल्पलाइनवर पडणारा ताण पाहता आरटीओने त्याला आणखी दोन हेल्पलाइनची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणे सोपे जाईल. तक्रारींसाठी 0२२-२३५३४३२0 आणि 0२२-२३५३४३२२ हे दोन नवीन हेल्पलाइन नंबर असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारी आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध होतात. प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तणूक, अवाजवी भाडे मागणे, बस थांब्यावर न थांबवणे यांसारख्या तक्रारी आरटीओकडे प्राप्त होतात. प्रवाशांना तक्रार करता यावी यासाठी १८00-२२0११0 हा टोल फ्री क्रमांकही मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या क्रमांकावर २४ तास सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तक्रार नोंदविता येते. २0११-१२ ते २0१५-१६ या पाच वर्षांत ताडदेव, अंधेरी आणि वडाळा आरटीओत एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. ताडदेव आरटीओत एकूण ३ हजार ९१, अंधेरी आरटीओत ७ हजार ३३0 आणि वडाळा आरटीओमध्ये ४ हजार ५२६ तक्रारी दाखल झाल्या. २0१५-१६मध्ये एकूण १ हजार १२९ परवाना निलंबन करण्यात आले आहेत. सध्याच्या टोल फ्री नंबरवर पडणारा ताण पाहता आरटीओने आणखी दोन हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचा निर्णय घेतला़ हे नंबर उपलब्धही करण्यात आले आहेत. नवीन नंबरवर तक्रार केल्यास त्वरित कारवाई केली जाईल, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)>ताडदेव आरटीओंतर्गत २0१६च्या एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत टोल फ्री नंबरवर आलेल्या विविध तक्रारींनंतर २६४ टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली. यात १५४ टॅक्सीचालकांवर निलंबनाची, तर ११0 टॅक्सीचालकांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली. जवळपास ३ लाख ४ हजार ५00 रुपये दंडही वसूल करण्यात आला. >आरटीओत प्राप्त झालेल्या तक्रारींची माहितीवर्षताडदेवअंधेरीवडाळा२0११-१२१,0१९२,४0९१,९२५२0१२-१३६0११,१६0१,१६९२0१३-१४५५९४१६४५५२0१४-१५४९७२,९२८६५0२0१५-१६४१५४१७३२७