शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये मतभेद!

By admin | Published: April 30, 2015 2:00 AM

रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी गुरुवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे.

मुंबई : रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी गुरुवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप राज्यात मोठ्या प्रमाणात होणार असला तरी मुंबईत संप यशस्वी होईल का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपात सार्वजनिक वाहतूक क्षेत्र, रिक्षा आणि टॅक्सी सामील होणार असले तरी संपावरून मुंबईत रिक्षा-टॅक्सी युनियनमधले मतभेदही उघड झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने सुरक्षा विधेयकातील टप्पा वाहतुकीचा प्रस्ताव तयार करून १३ सप्टेंबर २०१४ रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतर १६ आॅक्टोबरपर्यंत या नवीन प्रस्तावावर देशातील सार्वजनिक, खासगी वाहतूकदार आणि युनियनकडून हरकती मागविण्यात आल्या. या प्रस्तावात सर्व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांनी स्पर्धेत उतरावे, असे म्हटले असून मार्ग भाड्याने देण्याची तरतूद केली आहे. हे मार्ग निविदा मागवून भाड्याने देण्यात येणार आहेत. मात्र यामुळे फायद्यात चालणारे सर्व मार्ग बड्या वाहतूक कंपन्या घेण्याची शक्यता आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवांच्या वाट्याला तोट्यातील मार्ग येतील, अशी भीती सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवांना आहे. हा संप जरी पुकारण्यात आला असला तरी त्यावरून मात्र मतभेद उघड होत आहेत. एसटीतील मान्यताप्राप्त संघटनेने संपाला उघडपणे पाठिंबा न देता छुपाच पाठिंबा देणे पसंत केले आहे. तर एसटीतील अन्य संघटनांनीही विधेयकाला विरोध असल्याचे सांगत संपात मात्र सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. संपावरून मुंबईतील रिक्षा-टॅक्सी युनियनमध्येही मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियन, स्वाभिमान टॅक्सी संघटनांसह अन्य टॅक्सी संघटनांनी संपात सामील होणार नसल्याचे सांगितले. पोलीस सरंक्षणात ‘बेस्ट’ धावणारच्रस्ता सुरक्षा विधेयक २०१४ विरोधात देशव्यापी आंदोलनात बेस्ट सहभागी होणार नाही़ याउलट मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी भूमिका बेस्ट संघटनांनी घेतली आहे. मात्र यात बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी असल्याने बेस्ट प्रशासन उद्या पोलीस संरक्षणात बसगाड्या रस्त्यावर काढणार आहे़ च्नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्कर्सच्या वतीने कामगार, सार्वजनिक वाहतूक क्षेत्र, टॅक्सी-रिक्षा यांचे उद्या देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे़ यामध्ये बेस्ट कामगार संघटनाही उतरणार असल्याने प्रवशांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे़ परंतु या संपात शिवसेनेच्या संघटना सहभागी नाहीत़ संपकाळात बस रस्त्यावर धावण्याची खबरदारी बेस्ट प्रशासन घेणार आहे़ नेहमीप्रमाणे उद्या सर्व बसमार्गांवर बस गाड्या चालविण्यात येणार आहेत़च्मात्र आंदोलकांकडून दगडफेक अथवा अडथळे येण्याची शक्यता नकारता येत नाही़ म्हणून बसगाड्यांना लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहेत़ तसेच बसगाड्यांना व बस आगारांमध्ये पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी विनंतीही महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पोलिस आयुक्तांना केली आहे़ त्यानुसार आवश्यकतेनुसार पोलिसांची कुमक पाठविण्यात येणार आहे़ कारवाईचे संकेत : उद्या सर्व कामगारांनी विशेषत: बस चालक व वाहकांनी ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश बेस्टने दिले आहेत़ तसेच संपात सहभागी होणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद बेस्ट प्रशासनाने दिली आहे़आमच्या युनियनच्या टॅक्सी रस्त्यावर धावतील. विधेयकाला विरोध आहे. मात्र संप पुकारून प्रवाशांना अडचणीत आणणार नाही. - ए.एल.क्वाड्रोस मुंबई टॅक्सीमेन्स युनियन, महासचिवविधेयकाला आमचा विरोध असला तरी संपात आम्ही सामील होणार नाही. -तंबी कुरीयन, मुंबई रिक्षामेन्स युनियनभारतीय कामगार सेनेचाही पाठिंबाभारतीय प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मजदूर महासंघातर्फे विधेयकाविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली असून, भारतीय टॅक्सी-रिक्षाचालक महासंघातर्फे समर्थन देण्यात येत आहे. संपात सामील होण्याचा प्रश्नच येत नाही. प्रवाशांना अडचणीत का आणायचे, हाच आमचा प्रश्न असून संपाला अन्य मार्गानेही विरोध केला जाऊ शकतो. - के.के.तिवारी, स्वाभिमान टॅक्सी संघटनाकेंद्र सरकारच्या प्रस्तावित वाहतूक धोरणााला विरोध आहे, पण या संपात एसटी कर्मचारी सहभागी होणार नाही. आधीच एसटी तोट्यात आहे. अशा परिस्थितीत संप पुकारून एसटीला अजून अडचणीत आणणे योग्य नाही.- श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीससंपात अन्य रिक्षा-टॅक्सी संघटना सहभागी होणार नसल्या तरी आम्ही त्याकडे दुर्लक्षच केले आहे. या लहान संघटना असून त्याचा दबदबा नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोलणेच योग्य आहे. - उदयकुमार आमोणकर, नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे निमंत्रक