शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

रिक्षा-टॅक्सी चालकांचेही आता येणार ‘अ‍ॅप’

By admin | Published: October 09, 2016 2:12 AM

ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीमुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने ओला-उबरला टक्कर

मुंबई : ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीमुळे सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने ओला-उबरला टक्कर देण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी देखील स्वत:चा अ‍ॅप तयार केला असून दसऱ्यापासून ( दि.११) ही सेवा कार्यान्वित होणार आहे.मुंबईकरांना अनेक वर्षापासून चांगली सेवा देणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर सध्या ओला-उबरमुळे उपासमारीची वेळी आली आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी अनेक आंदोलने देखील केली. मात्र शासनाकडून या खासगी कंपन्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी त्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत स्वत:चे अ‍ॅप तयार केले आहे. शिव वाहतूक सेनेने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याद्वारे ओला-उबर प्रमाणेच यापुढे रिक्षा आणि टॅक्सी देखील सुविधा देणार आहेत. मंगळवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे उदघाटन होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी) महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तरतूदया नवीन तंत्रज्ञानामध्ये केवळ अधिकृत परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकानाच समाविष्ट केले जाणार आहे. शिवाय राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या मीटरनुसारच प्रवासी भाडे आकारणी करणार आहे. विशेष म्हणजे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या अ‍ॅपमध्ये प्राधान्याने उपाययोजना केलेल्या आहेत. - ओला उबेर या सारख्या खासगी कंपन्यांकडून १ किमी अंतराच्या आतील जवळचे भाडे स्वीकारले जात नाही. मात्र शिव वाहतूक सेनेच्या या सुविधेद्वारे सर्व प्रकारचे प्रवासी भाडे स्वीकारले जातील.तसेच अनेकदा प्रवाशांकडून जादा पैसे आकारण्याचेही प्रकार घडतात. मात्र याबाबतीत सदर अ‍ॅप सेवेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असणार आहे. याशिवाय ट्रक-टेम्पोचालक, अवजड वाहने यांना देखील या माध्यमातून वाहतूक व्यवसाय उपलब्ध होणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.