मुंबई : अनधिकृतपणे चालणाऱ्या खासगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी, हकीम समिती बरखास्त करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी १७ जून रोजी मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले हेत. बंदचा प्रवाशांना फटका बसू नये यासाठी खासगी वाहतुक, एसटी, बेस्टची मदत घेण्यात आल्याचे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहर पोलिसांबरोबरच वाहतुक पोलिसांचीही मदत घेतली आहे. रिक्षा संघटनांकडून केलेल्या मागण्यांवर विचार केला जात असल्याचे त्यांना वारंवार सांगितले आहे. तरीही बंद का पुकारण्यात आला आहे हे समजण्यापलिकडे आहे.बंदचा फटका उपनगरांमध्ये बसला असून ऐन पावसात रिक्षा नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
रिक्षा-टॅक्सी बंदने आज प्रवाशांचे हाल
By admin | Published: June 17, 2015 4:03 AM