सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. न्यायालयानं दिलेला निर्णय, शिवसेनेत झालेली फूट, राज्यातील परिस्थिती यावर बैठकीत चर्चा झाली. भविष्यातील घडामोडीबाबत कोअर कमिटीने पूर्ण लक्ष देऊन या परिस्थितीवर निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर राजकीय प्रश्न लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवेल. यावर चर्चेतून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अजूनही वेट अँन्ड वॉच भूमिकेत असल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी त्यांची मूळ शिवसेना असल्याचं सांगितले आहे. भाजप राजकीय अस्थिरतेत काय भूमिका घ्यावी यावर बैठकीत चर्चा झाली आहे. परंतु अजूनही वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या हिताचा निर्णय भाजपा घेईल. पुढील काळात प्रस्ताव येतील त्यावर कोअर कमिटी बसून योग्य तो निर्णय घेईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा बैठकीत झाली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला असताना त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह यावर भाजपा लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. चर्चेनंतर आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बहुमताची मागणी करण्याची आज तरी गरज वाटत नाही. यानंतर प्रत्येक घटनेनंतर मंथन आणि चर्चा होईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.