शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सक्तमजुरी

By admin | Published: January 17, 2017 8:43 PM

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  बाळासाहेब उर्फ प्रताप सुखदेव कांबळे (वय २८, रा. निमोणे, ता. शिरुर ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी ६ जणांची साक्ष नोंदविली.

हा गुन्हा मे २०१५ मध्ये घडला होता. या गुन्ह्यातील पिडीत मुलगी आणि तिचा भाऊ घरात झोपले होते. तेव्हा आरोपी घरात घुसला. त्याने अल्पवयीन मुलीला दुसऱ्या खोलीत नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करीत आरडा ओरडा केला आणि ती घराबाहेर पळत गेली. तेव्हा शेजाऱ्यांना माहिती देत, त्यांच्या मोबाईलवरून आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला होता.

या प्रकरणी न्यायालयाने कांबळे याला विनयभंग केल्याबद्दल १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तसेच अनाधिकाराने घरात शिरल्याबद्दल २ वर्षे आणि बाल लैगिंक अत्याचार कलम ७ व ८ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़