लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निर्माता, दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या चित्रपटाचे हक्क त्यांच्या भाचे सून माणिक मोरे यांच्याकडे देण्याचा निकाल पुणे जिल्हा न्यायालयाने दिला आहे़ त्यामुळे आता दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना टीव्हीवर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़दिल्लीतील नूपुर मार्केटिंग या कंपनीने दादा कोंडके यांच्या सात चित्रपटांच्या व्हिडीओ कॅसेट काढल्या होत्या़ त्याला मोरे यांनी आक्षेप घेऊन या चित्रपटांच्या हक्काबाबत १२ वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतली होती़ त्यात त्यांनी नूपुर कंपनीला हे चित्रपट पुन:प्रक्षेपित करणे, त्यांची प्रिंट काढणे किंवा त्यांचे व्हिडीओमध्ये रूपांतर करणे तसेच कोणत्याही मीडियात त्यांचा प्रसार करण्यास मनाई करावी, असे म्हटले होते़ पांडु हवालदार, आली अंगावर, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे मराठी तसेच खोल दे मेरी जुबान, आगे की सोच, तेरे मेरे बीच मे, अंधेरी रात मे दिया तेरे हात मे या हिंदी चित्रपटांच्या हक्काबाबत प्रश्न निर्माण झाला होता़
कोंडके यांच्या चित्रपटाचे हक्क भाचेसुनेकडे
By admin | Published: July 09, 2017 12:47 AM