शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

कसारा घाटात जनशताब्दीवर दरोडा

By admin | Published: February 04, 2016 4:31 AM

औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला

कसारा : औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला. भरदुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली खरी, पण कल्याण व इगतपुरी रेल्वे पोलिसांत हद्दीचा वाद असल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच बेकायदा फेरीवाले-गर्दुल्ल्यांवर संशय व्यक्त होऊनही पोलिसांनी तातडीने कोणतीच कारवाई केली नाही. या मार्गावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रवाशांना कसारा रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांनी बाटल्यांनी मारहाण केली होती. त्यातील जखमी प्रवासी अद्याप कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.औरंगाबादहून कुर्ला येथे निघालेल्या समरीन बेगम (२३) भाऊ सलीम यांच्यासोबत डी-७ या कोचमध्ये बसल्या होत्या. इगतपुरीत गाडी आल्यावर त्यांनी सामानाची आवराआवर केली आणि नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृहाकडे गेल्या. स्वच्छतागृहात दबा धरून बसलेल्या व्यक्तीने त्यांचा गळा दाबला आणि त्या ओरडू नयेत म्हणून नंतर तोंड दाबून धरले. पोटात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात, त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्याकडील रोख रक्कम, पर्स आणि अंगावरील दागिने लुटून बेशुद्धावस्थेत त्यांना तसेच टाकून घाटात गाडीचा वेग कमी झाल्यावर तो पळून गेला. बराच वेळ होऊनही बहीण न आल्याने सलीमने स्वच्छतागृहात शोध घेतला. त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्याने आरडाओरड करीत सहप्रवाशांच्या मदतीने त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. अखेर, प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली. स्थानिक रेल्वे पोलिसांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आधी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रकृती चिंताजनक बनल्याने ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय झाला. तोवर, रेल्वे पोलीस देवरे यांनी कुर्ला येथील त्यांच्या नातेवाइकांना घटना कळविल्यानंतर त्यांनी समरीन यांना कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. बेदम मारहाणीमुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्याचे आणि त्यांना या घटनेचा मानसिक धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)टोळी कार्यरतकल्याण ते कसारा आणि पुढे नाशिक मार्गावर गाडीतील प्रवाशांना लुटणारी टोळी कार्यरत असून बंदी असतानाही ते गुटखा, तंबाखूसह अन्य वस्तू विकतात आणि ते करताकरता प्रवाशांच्या किमती वस्तू लंपास करतात. त्याची माहिती वेळोवेळी रेल्वे पोलिसांना देऊनही फरक पडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.———————रेल्वे कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की आरपीएफचे कर्मचारी, जीआरपी कर्मचाऱ्यांनाही या फेरीवाल्यांनी अनेकदा धक्काबुक्की केली, पण हप्ते आणि पेशाची इभ्रत राहावी म्हणून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट, काही कर्मचाऱ्यांनी बदली करून घेणे किंवा गप्प बसणे पसंत केले.रेल्वे स्थानकांवर पाणी, गुटखा, तंबाखू, वडापाव विकणारे सुमारे ४५० हून अधिक परप्रांतीय फेरीवाले असून त्यातील बहुतांश उत्तर प्रदेशातील भिंडचे असल्याचे समजते. त्यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत. सर्व जण बेकायदा व्यवसाय करतात. दादागिरी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, असे प्रकार कसारा स्थानकात कायमच घडतात. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी हप्ता घेत असल्याने सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला.