लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमीर खानसह ‘दंगल’ व ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया झायरा वसीमच्या विमानातील विनयभंगानंतर समाज माध्यमांत संताप व्यक्त होत आहे. महिला आयोगानेही त्याची दखल घेतली आहे.झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. त्यांनी बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘१ एफ’सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘२ एफ’वर ४५ वर्षांचा एक इसम बसलेला होता. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराची मान व पाठीला स्पर्श केला. ती ओरडली. मात्र त्याबाबत सांगूनही कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने हा प्रकार मोबाइलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. मुंबई विमानतळावर उतरल्यावर झायराने घटना कथन करत ती इन्स्टाग्रामवर टाकली. सहारा पोलिसांनी झायरा उतरलेल्या हयात हॉटेलमध्ये जाऊन तिच्याकडून तक्रार नोंदवून घेतली.मुलींची अशी काळजी घेणार?मी जे अनुभवले ते भयानक होते, अशा प्रकारे मुलींची काळजी घेतली जाते का?, एवढे होऊन कोणी मदतीला येत नाही. हे अतिशय भयानक आहे, असे झायराने सांगितले.विस्तारा एअरलाइन्सचे स्पष्टीकरणझायराच्या मागील सीटवर बसलेला पुरुष प्रवासी हा नियमित स्वरूपात प्रवास करतो. तो प्रवासावेळी समोरच्या सीटवर पाय ठेवून झोपला होता. त्याने ‘डू नॉट डिस्टर्ब’ची सूचना केली होती. झायरा ओरडली तेव्हा विमान ‘लॅण्ड’ होत असल्याने त्यांच्याकडे कोणी गेले नाही. मात्र त्यानंतर पुरुष कर्मचारी गेला असता तिच्या आईने महिला कर्मचाºयाला बोलावण्याची मागणी केली. त्यानुसार इशिता सूद ही कर्मचारी गेली. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. हवाई सुंदरीने तक्रार करावयाची आहे का?, अशी विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. झायरा रडू लागल्याने विमान प्रवाशांत खळबळ उडाली. याबाबत आम्हीदेखील सविस्तर चौकशी करणार आहोत.झायरा ‘धाकड’ हो - गीता फोगाट‘दंगल’ चित्रपटात कुुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका झायरा वसीमने साकारली होती. या घटनेबाबत गीता फोगाटने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने झायराला न घाबरण्याचे आवाहन केले. फोगाट भगिनीची भूमिका करणारी तू धाडसी ‘धाकड’ गर्ल आहेस. अशा घटना घडत असल्यास घाबरू नका, तर समोरच्या व्यक्तीच्या मुस्काटात हाणा, असा सल्ला तिने झायराला दिला.महिला आयोगाकडून चौकशी : विमानसेवा प्राधिकरण व पोलिसांकडून यासंदर्भातील अहवाल मागवलेला आहे. संबंधितावर कारवाईची मागणी केल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.कठोर कारवाईचीमागणी - नीलम गोºहेशिवसेनेच्या प्रवक्त्या आ. नीलम गोºहे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पॉक्सोसोबतच दंडात्मक कारवाईचीही मागणी केली. नागपूर अधिवेशनात त्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.
‘दंगल’गर्लच्या घटनेबाबत समाज माध्यमांत संताप, विमानात विनयभंग; महिला आयोगाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:27 AM