मुंबई : धार्मिक स्थळांवर कायदेशीर कारवाई करण्यात अडथळा निर्माण केल्याबद्दल शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विधी व न्याय विभागाने केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.२९ आॅक्टोबर २०१५ ला वळुंज येथील एका बेकायदा धार्मिक स्थळावर कारवाई करण्यासाठी आलेल्या तहसीलदाराला शिवीगाळ करून त्यांनी कारवाई थांबविली होती. शुक्रवारच्या सुनावणीत राज्य सरकारने विधि व न्याय विभागाने खैरे यांच्यावर कारवाई करण्याबाबत केलेल्या शिफारशीवर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडे मुदत मगितली.राज्य सरकारने खैरे यांच्यावर कारवाई करण्यास परवानगी दिली, तर खैरे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा होईल.
चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाईची विधी, न्याय विभागाची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 1:21 AM